Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गुलाबराव पाटलांनाही आता ‘बिग बॉस’चे वेध; म्हणाले, ‘ही तर सोन्यासारखी संधी’!

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्हाला बोलावलं तर नक्की जाऊ, अशी संधी कोणाला मिळत असते, असे सांगून आपण बिग बॉसच्या स्टुडिओमध्ये जायला तयार आहे, अशी इच्छा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बोलून दाखवली आहे. (If I get a chance, I will go to 'Bigg Boss': Gulabrao Patil)

मंत्री गुलाबराव पाटील हे सतत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. पाटील यांची संवादफेक, त्यांची भाषणशैली आणि मध्येच हिंदीतून येणारे डायलॉग यामुळे गुलाबराव पाटलांच्या भाषणाला निवडणुकीत मागणी असते. आता पाटील नवीनच कारणांमुळे चर्चेत आले आहेत. आता त्यांना बिग बॉसच्या स्टुडिओमध्ये जाण्याचे वेध लागले आहेत. तसे त्यांनी जळगावमधील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना इच्छा व्यक्त केली.

पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, मला तर असं वाटतंय की, गुलाबराव पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये कोणी बोलावत असेल तर अशी संधी मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण होते. मागील काळात मी नाटकांमध्ये, गाण्यांमध्ये कायम भाग घ्यायचो. बिग बॉसमध्ये बोलावलं तर त्याच्यासारखी सोन्याची संधी नाही. तशी संधी मिळाली तर निश्चितपणाने त्या स्टुडिओमध्ये जाऊ.

बिग बॉस हा मराठी आणि हिंदी भाषातून प्रसारित होणारा टीव्ही शो आहे. हिंदी भाषेतील बिग बॉस उद्यापासून म्हणजेच १ आक्टोंबरपासून सुरू होत आहे, तर मराठीतील बिग बॉस हा २ आक्टोंबरपासून सुरू होणार आहे. हा खेळ तब्बल तीन महिने चालतो. खंर तर ‘बिग बॉस’ ही दूरचित्रवाणीवरील वाद्‌ग्रस्त मालिका आहे. आतापर्यंत हा शो अनेकदा वादामुळेच गाजला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT