औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि आमच्यात आता बहिण-भाऊ म्हणून नातं राहिलंच नाही. राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे वैरी आहोत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बहिण-भावातील सध्याच्या नात्याबाबत भाष्य केले. (We no longer have a brother-sister relationship : Dhananjay Munde)
जनता जर माझ्या पाठीशी असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही माझा पराभव करू शकत नाहीत, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना धनंजय मुंडे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा मुंडे आणि आमच्यात पूर्वी नातेसंबंध होते. नात्यातून आमच्यात राजकारणामध्ये वैर निर्माण झाले. त्यामुळे कुणाच्या वक्तव्यामुळे, वागण्यामुळे त्याचे काय परिणाम होतात, हे ज्यांनी त्यांनी आत्मपरिक्षण करावे. अशा पद्धतीची वक्तव्ये त्यांच्याकडून (पंकजा मुंडे) वारंवार येत आाहेत. ती बरोबर की चुकीची आहेत, याचे ज्यांनी त्यांनी आकलन करून त्या पद्धतीने मांडणी करावी, असा सल्लाही त्यांनी या वेळी बोलताना दिला.
दरम्यान, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण-भावामधील राजकीय वाद महाराष्ट्राला नवीन नाही. या दोघांमधून विस्तव जात नाही. संधी मिळेल त्यावेळी हे दोघे एकमेकांवर तोंडसुख घेत असतात. मुळात हे दोघे निवडणुकीच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या फडणवीस सरकारमध्ये त्या ग्रामविकास मंत्री हेात्या, तर धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता होता.
त्यानंतरच्या २०१९ च्या निवडणुकीत मात्र धनंजय यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. धनंजय मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सामजिक न्याय विभागाचे मंत्री बनले होते. मात्र, भाजपकडून पंकजा यांना अद्याप तरी कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी बोलताना मंत्रीपदासाठी माझी तेवढी पात्रता नसेल असे वक्तव्य केले हेाते. त्यानंतर जनतेची ताकद माझ्या पाठीशी असेल तर मोदीसद्धा मला हरवू शकत नाहीत, असे धक्कादायक विधान केले होते. त्यानंतर मी सध्या बेरोजगार आहेत, असेही वाद्ग्रस्त विधान केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.