Gulabrao Patil News
Gulabrao Patil News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil News: '' जर मी शिंदेंसोबत गेलो नसतो तर...''; गुलाबरावांनी सांगितली ठाकरेंची साथ सोडण्यामागची 'राज की बात'

सरकारनामा ब्यूरो

कैलास शिंदे

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात पाच आमदार होते. पाचपैकी चार आमदार शिंदेंसोबत गेले होते, मी एकटाच राहिलो. मी नागपूरकडे नजर मारली तर त्या ठिकाणचाही आमदार गेला, बुलडाण्याचाही गेला, नाशिक,ठाणे आणि दादरचाही आमदार गेला. नागपूर ते मुंबई मी एकटा राहिलो, मी काय करणार होतो.जर मी शिंदेंसोबत गेलो नसतो तर एवढा विकास झाला असता का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटातील प्रवेशामागची 'राज की बात' जाहीरपणे सांगितली.

शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात ठाकरेंना रामराम ठोकत शिंदे गटासोबत जाण्यामागच्या घडामोडींवर भाष्य केलं. पाटील म्हणाले,लोकं आम्हांला गद्दारी केली, गद्दारी केली असे म्हणतात. पण मी तर तेहतीसाव्या क्रमांकावर गेलो,अगोदर ३२ आमदार गेले होते. माझ्या जागी तुम्हीही असता तर काय केले असते, जळगाव जिल्ह्यात पाच आमदार होते, पाच पैकी चार आमदार शिवसेना गेले होते, मी एकटाच राहिलो होतो.

पाटील म्हणाले, मी आजूबाजूला नजर मारली. तर नागपूरकडे त्या ठिकाणचाही आमदार गेला, बुलडाण्यांचाही गेला. नाशिक,,ठाणे आणि दादरचाही आमदार गेला. नागपूर ते मुंबई मी एकटा राहिलो, मी काय करणार होतो, जर मी गेलो नसतो तर एवढा विकास झाला असता का? तसेच मी विचार केला जळगावचे चारही शिवसेनेचे आमदार गेले चार खांदेकरी गेल्यानंतर एकटा ‘आग्या’ने काय करावे? मग मी पण निर्णय घेतला भागो आणि मी गेलो असं पाटील यांनी म्हटलं.

शिंदे गटासोबत गेल्यावर माझ्यावर टीका सुरू झाली. काय झाडी, काय डोंगर अशी अनेक दूषणे आपणांस देण्यात आली. पण जर मी चुकीचा निर्णय घेतला असता, तर आज शिंदे - फडणवीस सरकारमध्ये आपण जेवढी कामे मतदारसंघात झाली आहेत. तेवढी कामे झाली नसती, मी मूळ ट्रॅकमध्ये आलो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आम्ही सट्टा खेळलो...

सन १९८७ मध्ये मी शिवसेने(Shivsena)त गेलो, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी हेच शिकविले, मराठी माणूस आणि हिंदुत्व याच्या रक्षणासाठी उभी असलेली ‘शिवसेना’त्याच विचारांनी आपण गेलो, माझ्यावर आज जे टीका करीत आहेत,त्यांनी विचार करावा मला हे मंत्रीपद अगदी सहज मिळाले नाही, मला तुरूंगवास पत्करावा लागला, आंदोलने केली, शिंगाडे मोर्चा काढणारा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात गुलाबराव प्रसिध्द आहे.

हे जर आम्ही पाप केलं असेल तर...

आम्ही आयुष्याविरोधात घातले, मी शिवसेना सोडली. त्यावेळी मंत्री पद गेलं असतं, आमदारकीही गेली असती. परंतू, आम्ही सट्टा खेळलो.आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तसेच भगव्या झेंड्याच्या रक्षणासाठी भाजपबरोबर गेलो आहोत. हे जर आम्ही पाप केलं असेल तर जनता निश्‍चितच त्याचा विचार करेल असा विश्वासही गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT