Solapur News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तब्बल ३१ वर्षांनंतर १३५ जागा जिंकत स्पष्ट बहुमताने विजय मिळविला आहे. त्याची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे. अनेक नेत्यांचे नातेवाईकही कर्नाटकातील निवडणुकीच्या मैदानात होते. त्यातील काहींनी बाजी मारली, काहींच्या पदरी पराभव आला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भाची डॉ. अंजली निंबाळकर यांचाही या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. (Ashok Chavan's niece lost in Karnataka elections)
बेळगाव (Belgaum) जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाच्या अंजली निंबाळकर या काँग्रेसच्या (Congress) विद्यमान आमदार होत्या. पक्षाने त्यांना खानापुरात पुन्हा संधी दिली होती. मात्र, गेल्या वेळी पाच हजार मतांनी पराभूत झालेले विठ्ठल हालगेकर यांनी मागील पराभवाचे उट्टे काढत या वेळी निवडणूक जिंकली आहे. गेल्या वेळी मतविभागाची फायदा आमदार निंबाळकर यांना झाला होता. यंदा मात्र, काँग्रेसची लाट असूनही निंबाळकर यांना पराभावाचे तोंड पहावे लागले आहे.
काँग्रेसच्या चिन्हावर लढलेल्या अंजली निंबाळकर यांना ३७ हजार २०५ मते पडली असून त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार हालगेकर यांना ९१ हजार ८३४ मते मिळाली आहेत. या वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार असूनही भाजपचे हालगेकर मोठ्या मताधिक्क्याने जिंकले आहेत. त्यामुळे निंबाळकर यांच्याविरोधात किती असंतोष असेल, हे दिसून येते.
दरम्यान, डॉ अंजली निंबाळकर यांनी २०१३ मध्येही निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना अवघी १७ हजार ६८६ मते मिळाली होती. त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्या. कर्नाटकचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हेमंत निंबाळकर हे त्यांचे पती आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.