Uday Samant
Uday Samant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ओरडून बोलले म्हणजे पटते हा भ्रम नेत्यांनी सोडावा!

Sampat Devgire

नाशिक : युवकाने (Youth) विचारलेल्या `चांगले नेतृत्व कसे घडवू शकता` (Leadership) या प्रश्नावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, माझ्यापेक्षा इतर कोणीच शहाणा नाही, मी बोलतो ते खरे आहे. जोरात ओरडून बोलले म्हणजे पटते. हे बंद झाले, की नेतृत्व घडते. (if we speak loudly then people convince is not true)

‘यिन’चे ‘चला घडू देशासाठी’ या दोनदिवसीय समर यूथ समीटला महाकवी कालिदास कलामंदिरात सुरवात झाली. या वेळी युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली. ही प्रश्नोत्तरे अशी,

प्रश्‍न : मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, याबद्दल काय सांगाल?

सामंत : मी पालीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पालिका, महापालिकेसह मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि वाढल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेप्रमाणे राज्यात आदर्श शाळा घडविण्याचे धोरण स्वीकारलेले आहे.

‘यिन’चे ‘चला घडू देशासाठी’ या दोनदिवसीय समर यूथ समीटला महाकवी कालिदास कलामंदिरात सुरवात झाली. या वेळी ते बोलत होते.

प्रश्‍न : नेतृत्व टिकण्यासाठी कर्तृत्वाची धार कशी लावायची? शेतकऱ्यांनी देव म्हणावे, यासाठी काय करायला हवे?

सामंत : वक्तृत्व असून नेतृत्व मिळते का? याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे. वक्तृत्वाला कर्तृत्वाची जोड द्यावी लागते. तसेच राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रश्‍न : परीक्षा रद्द आणि पुन्हा परीक्षा, या निर्णयाचा अनुभव तुम्हाला कसा आला?

सामंत : परीक्षा रद्द केल्याने मी विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो. कोरोनानंतर आता ऑफलाइन परीक्षा घेण्यात येत आहे.

प्रश्‍न : कोरोनामध्ये पदवी घेतलेल्यांना नोकरी लागणार नाही, असे म्हटले जाते. त्याबद्दल काय सांगाल?

सामंत : २०१९ आणि २०२० मधील परीक्षार्थींना नियमित पदवी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. ‘कोविड बॅच’, असा संभ्रम विरोधकांनी पसरविण्याचा प्रयत्न केला. एक प्रकरण पुढे आले असताना संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रश्‍न : कधी राममंदिर, कधी प्रबळ हिंदुत्व कोणाचे? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असल्याने गोंधळाची परिस्थिती तयार होते. त्याबद्दल आपले मत काय?

सामंत : राजकारणात सुसंस्कृतपणा हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करू यात, असे म्हटलेले आहे. हे जरी एकीकडे असले, तरीही जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून तरुणाईचे वाट लावण्याचे काम सुरू आहे. जातीचे बीज रुजायला नको म्हणून एकत्र राहून जातीभेद विसरायला लावणारे देशातील पहिले वसतिगृह नाशिकमध्ये उभे राहिले आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT