NCP Ajit Pawar News: इगतपुरी नगरपालिकेत संजय इंदुलकर यांच्या एका निर्णयाने वातावरण फिरले. श्री. इंदुलकर यांची तीस वर्षांची एक हाती सत्ता नवख्या उमेदवाराने खालसा केली. त्यामुळे इगतपुरी नगरपालिका निवडणुकीचा निकाल धक्कादायक असाच ठरला.
इगतपुरी नगरपालिकेवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची गेले तीस वर्ष सत्ता होती. शिवसेनेने शहराची सर्व सूत्रे संजय इंदुलकर यांच्या हाती दिली होती. तीस वर्ष शहराचा कारभार करू नये निवडणुकीच्या तोंडावर इंदुलकर यांनी धक्कादायक निर्णय घेतला.
ऑपरेशन लोटस या मोहिमेत इंदुलकर यांनी निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना ठाकरे पक्षाला गाफील ठेवले. मुंबईत जाऊन एका रात्रीत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या या प्रवेशाने अनेकांना धक्का बसला.
या निवडणुकीत गेली ३० वर्ष कारभार करणाऱ्या इंदुलकर यांना पक्षांतर का केले? याचा खुलासा शेवटपर्यंत करता आला नाही. शहरातील चिघळलेले प्रश्न आणि दुरावस्था याची सर्वस्वी जबाबदारी इंदुलकर यांच्यावर विरोधकांनी उलटवली. इंदुलकर यांच्या प्रवेशाच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मतदारांनी सहानुभूती दाखवली.
निवडणुकीच्या तोंडावर माजी नगराध्यक्ष इंदुलकर यांनी शिवसेनेला संकटात टाकले. त्यामुळे शिवसेना त्यातून सावरू शकली नाही. तशी संधीही या पक्षाला मिळाली नाही. माजी आमदार वसंत गीते यांनी ऐनवेळी उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी झाले नाहीत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण हे किंग मेकर ठरले. त्यांनी भाजपचे उपनगराध्यक्ष नेम खान यांचा पराभव केला. शिवा शहरातून १३ नगरसेवक निवडून आणले.
या निवडणुकीत शिवसेनेच्या शालिनी खातळे या पहिल्यांदाच थेट नगराध्यक्षा झाल्या. मात्र त्यांच्या पक्षाचे अवघे पाच सदस्य निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची मदत श्रीमती खातळे यांना नगराध्यक्षपदी विराजमान करण्यात यशस्वी ठरली. तीस वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाला अवघी एक जागा मिळाली.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.