Dr. Rahul Aher Politics: आमदार राहुल आहेर यांचा ‘तो’ निर्णय ठरला रामबाण; पक्षाने सोपविलेली जबाबदारी फत्ते, चांदवड, ओझर, पिंपळगावला झाले भाजपचे नगराध्यक्ष!

Dr Rahul Aher political decision success: चांदवडच्या निवडणुकीत आमदार डॉ. राहुल आहेर यांचे अचूक नियोजनाने भाजप पुन्हा सत्तेत.
Dr Rahul Aher | Devendra Fadanvis
Dr Rahul Aher | Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Chandwad BJP News: चांदवड नगरपरिषदेत पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. नगराध्यक्षांसह सर्वाधिक नगरसेवक भाजपच्या खात्यात जमा झाली. यामध्ये भाजपने केलेले डावपेच गाफील महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागले

चांदवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे वैभव बागुल थेट नगराध्यक्ष झाले. क्षाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या. या निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे विरोधकांना गाफील ठेऊन भाजपने अचूक राजकीय डाव टाकला. तो यशस्वी झाला.

निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी भाजप प्रवेश केला. त्यात आमदार डॉ. राहुल आहेर यांचे डावपेच होते. भाजप विरोधकांना त्याचा सुगावाही लागला नाही.

Dr Rahul Aher | Devendra Fadanvis
Mangesh Chavan Politics: उन्मेष पाटील यांनी देशमुख गटाशी तडजोड केली, तरीही आमदार मंगेश चव्हाण हेच ठरले चाळीसगावचे किंग!

माजी आमदार कोतवाल यांनीही ज्या पक्षात अनेक वर्षे काढली, आमदारकी मिळवली त्याच पक्षाला खिंडीत गाठले. डॉ. राहुल आहेर यांचा हा डाव भाजपच्या पथ्थ्यावर पडला. त्यांना पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग सुकर झाला. भाजपच्या यशाचे बहुतांशी श्रेय आमदार आहेर यांच्या या डावपेचांना जाते.

Dr Rahul Aher | Devendra Fadanvis
Saroj Ahire Politics: एकनाथ शिंदेंचा वारू दोन महिलांनी रोखला; ‘बाप’ काढणारे करंजकर टप्प्यात येताच, अहिरेंकडून हिशोब चुकता!

चांदवड नगरपरिषद निवडणुकीत आमदार डॉ. आहेर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दमदार यश मिळवले. राजकीय वर्तुळात त्यांच्या रणनीतीची आणि नियोजनक्षमतेची जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ११ नगरसेवक विजयी झाले.

निवडणुकीपूर्वी पक्षश्रेष्ठींनी आमदार डॉ. आहेर यांच्यावर चांदवड, ओझर आणि पिंपळगाव बसवंत या तीनही नगरपरिषदांची प्रभारी जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी स्वीकारताना डॉ. आहेर यांनी गाजावाजा न करता नियोजन केले.

स्थानिक समीकरणांचा अचूक अभ्यास, कार्यकर्त्यांशी थेट संवाद, योग्य उमेदवारांची निवड आणि प्रचाराची दिशा ठरवण्यात त्यांनी दाखवलेली स्पष्टता निवडणूक निकालात ठळकपणे दिसून आली. या तिन्ही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष झाले. अन्यत्र कुठेही भाजपला नगराध्यक्ष करता आला नाही.

आमदार डॉ. आहेर यांनी चांदवड सोबतच ओझर आणि पिंपळगाव बसवंत नगरपरिषदांमध्येही प्रभावी नियोजन करून भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आणला. एकाच वेळी तीन नगरपरिषदांवर भाजपचा नगराध्यक्ष झाल्याने पक्षात त्यांचे हे यश चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com