Sajan Pachpute Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar crime news : कत्तलसाठी डांबलेल्या गायींना सोडवणाऱ्या गोरक्षकांना दगडाचा जीवघेणा मारा; शिवसेना उपनेत्याविरोधात गुन्हा दाखल

Shrigonda Police Shiv Sena Deputy Leader Sajan Pachpute illegal transport cattle Ahilyanagar : अहिल्यानगरमधील शिवसेना उपनेते साजन पाचपुते याच्यासह दहा जणांविरोधात गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतूक प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

Pradeep Pendhare

Maharashtra crime updates : श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांना सोडविण्यासाठी आलेल्या गोरक्षकांना जीवे मारण्याची धमकी देत दगडफेक केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन (रा. उरुळी कांचन) यांच्या फिर्यादीवरून शिवसेना उपनेते साजन पाचपुते याच्यासह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

साजन सदाशिव पाचपुते (रा.काष्टी), मुस्तफा कुरेशी, इब्राहिम कुरेशी, आतिक कुरेशी (तिघे रा. श्रीगोंदा), महेश चव्हाण, शारदा महेश चव्हाण, कोकणगाव तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष शिंदेंवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला.

श्रीगोंदा इथला गो-तस्कर मुस्तफा कुरेशी, इब्राहिम कुरेशी, आतिक कुरेशी या तिघांनी कत्तलीसाठी गोवंश जमा केल्या होत्या. साजन सदाशिव पाचपुते यांचेमार्फत महेश चव्हाण, शारदा महेश चव्हाण यांच्या शेतामध्ये ही गोवंशीय जनावरं डांबून ठेवली होती. ही जनावरं साजन पाचपुते आणि शिंदे यांच्या मदतीने श्रीगोंदा इथं कत्तलीसाठी घेऊन जाणार होते. यानंतर हे गोमांस पुणे (PUNE) आणि मुंबई येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

गोरक्षक अक्षय कांचन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी 14 गोवंशीय जातीचे जनावरं चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी डांबून ठेवल्याचे आढळले. महेश चव्हाण याने शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांना फोन लावून दिला असता साजन पाचपुते यांनी ते लोक माझे आहेत, गायीची कत्तल माझे जीवावर करतात, त्याच्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका, नाहीतर तेथून जिवंत जाऊ देणार नाही, अशी धमकी देत फोनवर शिवीगाळ केली.

गोरक्षकांनी डांबून ठेवलेल्या गायी सोडवण्यास सुरवात केल्यावर महेश चव्हाण, शारदा महेश चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष शिंदे यांनी दमदाटी करुन शिवीगाळ केली. तसेच तेथील जवळील शेतात काही कुरेशी समाजाचे लोक आणि पारधी समाजाचे लोकांनी दगड फेक केली. गोरक्षकांबरोबर मदतीला असलेल्या पोलिसांनी आणखी पोलिस बळ मागवत गोवंशीय जनावरांना सोडवले. ही सोडलेली गोवंशीय जनावरे संगोपनासाठी गोशाळेत पाठविण्यात आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT