background of Kharat family controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kalpana Kharat Investigation : ऐशोआरामी जीवनात रमलेली कल्पना खरात; लग्नपूर्वी होती सुनीता, कुटुंबाची 'हिस्ट्री' समजावून घ्या...

Who is Kalpana Kharat in Ashok Kharat case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या पत्नीविरोधात शिर्डी इथं बेकायदा सावकारकी गुन्हा दाखल होताच पसार झालेली कल्पना खरातची दुसरी बाजू समोर आली आहे.

Pradeep Pendhare

Kalpana Kharat past name Sunita investigation: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातसह पाच जणांविरोधात शिर्डीत बेकायदेशीर सावकारकी आणि जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात दाखल गुन्हा दाखल झाला. कल्पना खरातविरोधातील पहिला थेट गुन्हा आहे. कल्पना खरात पसार असून, तिच्या शोधासाठी दोन पथक रवाना झालीत.

परंतु कल्पनाचं दुसरं रूप पोलिस तपासातून समोर येताना दिसत आहे. कल्पनाचं पूर्वीचं नाव हे सुनीता आहे. तिच्या माहेरकडील लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे. पण अशोक खरातशी लग्न झाल्यानंतर कल्पना ऊर्फ सुनीता हिचं जीवन बदललं आणि ऐशोआरामाच्या जीवनात रमली!

कल्पना खरात ऊर्फ सुनीत हिच्याविरोधात शिर्डी (Shirdi) पोलिस ठाण्यात बेकायदेशीर सावकारकी आणि जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर ती पसार झाली. पोलिसांनी तिच्या शोधासाठी दोन पथकं तैनात केली आहे.

कल्पना ऊर्फ सुनीता ही पुणे किंवा राज्याबाहेर पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु पोलिसांनी तिचा शोध घेत असताना, पोलिस खरातच्या कर्मयोगीनगरच्या तृप्तबाला बंगल्यावर पोहोचले. तिथंपासून पुढं कल्पनाच्या कुटुंबाची माहिती समोर येऊ लागली आहे.

कल्पनाचे पूर्वीचे नाव, सुनीता आहे. ती मूळ नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी गावची आहे. तिच्या माहेरकडील कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आहे. कल्पनाचा मोठा भाऊ याचा अपघाती मृत्यू झालेला आहे. वडिलांचे आजारापणाने निधन झाले आहे. वृद्ध आई, विधवा भावजयी आणि लहान भाचा असून, त्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे.

कल्पना हिच्याशी लग्न करतेवेळी अशोक खरातचे वय जास्त होते. हे लग्न एका नातेवाइकाच्या मध्यस्थीने झाले. अशोक खरात वयानं मोठा असल्यानं, त्याच्याच कुटुंबियांनी लग्नाचा खर्च केला. लग्नानंतर कल्पनाचे जीवनमान बदलले. ती ऐशोआरामी जीवन जगू लागली. यातून माहेरच्या लोकांबरोबर, नातेवाइकांबरोबर तिचे संबंध दुरावले.

कल्पनाचे दोन भाऊ नाशिकमध्येच...

कल्पनाचा भाऊ हा सिन्नर-शिर्डी महामार्गावरील एका हार्डवेअरच्या दुकानाचा व्यवसाय करतो. दुसरा भाऊ हा नाशिकमध्ये आहेत. कल्पना लग्नानंतर तिच्या, गावी पाडळीत कमी येणे-जाणे कमी केले होते. दरम्यान, खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी तृप्ताबाला या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बळकावलेली जमीन दहा कोटी रूपयांची...

अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना हिने, बेकायदेशीर सावकारकी करत जमीन व्यवहारात फसवणूक करत, शिर्डीतील एका शेतकऱ्याची दहा कोटी रुपयांची मालमत्ता लुबाडली आहे. शिर्डी पोलिसांनी खरात व पत्नी कल्पना अशोककुमार खरात (रा. नाशिक), किरण सोनवणे (रा. निमगाव), अरविंद बातके (रा. साकुरी) व अशोक प्रभात तांबे या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रावसाहेब गोंदकर यांची शिर्डी व निघोज परिसरात दहा एकर वडिलोपार्जित जमीन आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने ते आर्थिक अडचणीत होते. त्यावेळी त्यांनी मित्राच्या मध्यस्थीने अशोक खरात याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT