Rupali Chakankar Pressure Allegations : 'बिंग' फुटणार? अशोक खरात सावध; चाकणकरांचा पोलिसांवर थयथयाट? सर्व काही आलं समोर...

Ashok Kharat Case Rupali Chakankar Faces Pressure Claims: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला वाचवण्यासाठी रूपाली चाकणकर यांनी अहिल्यानगर पोलिसांना फोन करत, फैलावर घेतल्याचं समोर आलं आहे.
Rupali Chakankar pressure allegations controversy
Rupali Chakankar pressure allegations controversySarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Case Controversy: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात, महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना, रूपली चाकणकर यांनी अहिल्यानगर पोलिसांविरोधात केलेल्या थयथयाटाचा कारनामा समोर आला आहे.

अशोक खरात याच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी रूपाली चाकणकर अहिल्यानगर पोलिसांवर दबाव आणत होत्या. यासाठी रूपाली चाकणकर यांनी अहिल्यानगर पोलिसांना फोन करून फैलावर घेतलं होतं. तसंच मेल देखील केला होता. विशेष सुनावणी देखील घेतली होती. यामुळे रूपाली चाकणकर यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

नाशिकचा (Nashik) अशोक खरात याच्या लैगिंक शोषणाचा भांडाफोड अहिल्यानगर पोलिसांनी केला. अशोक खरात याच्या कारनाम्यावर अहिल्यानगर पोलिसांनी फेब्रुवारीपासून लक्ष ठेवून होते. एका युवतीने शिर्डी पोलिसांकडे नीरज जाधव अश्लील फोटोवरून आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची 18 फेब्रुवारीला तक्रार दिली होती.

या तक्रारीची पोलिसांनी उलट तपासणी केल्यावर, यामागे कॅप्टन अशोक खरात असल्याचं समोर येत होतं. नीरज जाधव हा अशोक खरात याच्याकडे कामाला होता. नीरजचा शोध घेताना, पोलिसांनी (Police) त्याचं घर गाठलं. पण तो तिथं आढळला नाही. उलट त्याच्या आईकडून कॅप्टन खरातविषयी नीरजकडे काही महत्त्वाचे पुरावे आहेत, अशी माहिती मिळाली. नीरजच्या आईच्या दाव्याला त्याच्या दोन मित्रांनी आणखी दुजोरा दिला.

Rupali Chakankar pressure allegations controversy
Popatrao Pawar controversy : अशोक खरातमुळे पेच वाढला; पद्मश्री पोपटराव पवारांचा ठाम इशारा, “अख्खं गाव माझ्या..!”

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नीरजचा शोध घेतला. यानंतर नीरजने संरक्षण दिले अन् पोलिसांना त्याने व्हिडिओ काढून दिले. यातून धक्कादायक माहिती समोर आली. याच दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी अशोख खरातच्या हाय-प्रोफाइल कारनामे पोलिस महासंचालकांना सांगितले. पुढे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवले. उघडपणे तपास करण्याऐवजी गोपनीयपद्धतीने तपास चालू ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना पोलिसांना दिल्या.

Rupali Chakankar pressure allegations controversy
Fake Baba Ashok Kharat Nashik Case : महिलांच्या शोषणात भोंदूगिरीचा ‘खरात पॅटर्न’? रंजना गवांदेंनी मांडली धक्कादायक आकडेवारी...

खरात परदेशात पळून जाण्याची तयारी

यानंतर महिन्याभर पोलिसांनी संयमाची भूमिका घेत, पुरावे गोळा केले. याच दरम्यान, अशोक खरात याला आपल्याविरोधात पोलिस सापळा आवळत असल्याची कुणकुण लागली. त्यानुसार त्याने परदेशात पळून जाण्याची तयारी केली होती. याचवेळी दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रूपाली चाकणकर अहिल्यानगर पोलिसांविरोधात आक्रमक झाल्या होत्या.

चाकणकर यांचा पोलिसांवर दबाव?

या प्रकरणातील नीरज जाधव याला अटक न करता फिर्यादी मुलीचाच उलट तपास करत असल्यावरून, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी फोन करून अहिल्यानगर पोलिसांना फैलावर घेतले. तशी माहिती आता समोर येऊ लागली आहे.

13 मार्चला त्यांनी आयोगाकडून पोलिसांना मेलच पाठविला. 17 मार्चला यावर आयोगात खास सुनावणी घेत अहिल्यानगर पोलिसांना धारेवर धरले. चाकणकर एवढा दबाव का आणत होत्या, यावर आता वेगवेगळ्या चर्चा घडू लागल्या आहेत. महिला आयोगाच्या सुनावणीच्या दिवशीच अशोक खरात याला अटक केली.

लैंगिक शोषणाचा खरात पॅटर्न

कॅप्टन अशोक खरात स्वतः महिलांचे लैंगिक शोषण करायचा. पण अशोक खरात त्याच्याकडे येणाऱ्या महिला-पुरुषांच्याही, अशा संबंधांसाठी जोड्या जुळवायचा. या आधारे त्याने काही बड्या लोकांना ब्लॅकमेल केल्याची माहितीही पोलिसांकडे आहे. खरात याची नाशिक, अहिल्यानगरसह अन्य अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. याशिवाय विदेशातही त्याची मालमत्ता असल्याचे सांगितले जात आहे. स्वतःला 'गुरू' म्हणवून घेणारा खरात विदेशात मात्र लक्झरीयस लाइफ जगायचा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com