Sanjay Raut, Devendra Fadnavis, PM Narendra Modi, RSS Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : "...तर विधानसभेला RSS आणखी एक फेक नरेटिव्ह सेट करेल"; राऊतांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut On RSS : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केल्यामुळे भाजपला मोठा फटका बसल्याचा दावा भाजपकडून केला जातो. तर हाच नरेटिव्ह कसा खोटा होता हे लोकांना सांगण्यासाठी आता आरएसएस मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Jagdish Patil

Dhule News, 05 Oct : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कारखाना आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारात उतरणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात राऊतांना प्रश्न विचारला असता त्यांनी संघ आणि भाजपवर हा आरोप केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केल्यामुळे भाजपला (BJP) मोठा फटका बसल्याचा दावा भाजपकडून केला जातो. तर हाच नरेटिव्ह कसा खोटा होता हे लोकांना सांगण्यासाठी आता आरएसएस मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

यावर बोलताना राऊत म्हणाले, "कुणीही कोणता फेक नरेटिव्ह सेट केलेला नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हाच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कारखाना आहे. शिवाय आरएसएस खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असेल तर ते आणखी कोणता तरी फेक नरेटिव्ह सेट करेल."

तर आरएसएस ही एक सांस्कृतिक संघटना असून ती राजकीय नसल्याचं मी आत्तापर्यंत ऐकत होतो. पण आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत, असं जर त्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं असेल तर त्यांनीच त्यांची भूमिका जाहीर करावी, असं राऊत म्हणाले.

भाजपसाठी PM मोदी गल्लीबोळात

दरम्यान, भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गल्लीबोळात फिरत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. पंतप्रधान मोदी आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलातना राऊत म्हणाले, "देशाचे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात डेरा टाकून बसले आहेत. भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान गल्लीबोळात फिरत आहेत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT