Chhatrapati Shivaji Maharaj statue Unveiling Kolhapur : कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकातील बहुशास्त्राधारित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
यावेळी जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचं थेट कनेक्शन कसं आहे हे सांगितलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "आज आपण इथे शिवाजी महाराजांच्या मुर्तीचं अनावरण करत आहोत.
ही फक्त एक मुर्ती नाही, कारण मुर्ती तेव्हा बनवली जाते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची विचारधारा, त्यांचं काम मनापासून आत्मसात करतो. आपण इथे आलो आणि मुर्तीचं अनावरण केलं आणि त्यांनी ज्या गोष्टीसाठी आपलं आयुष्य वेचलं, ते ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर लढले त्यासाठी आपण लढलो नाही, तर या मुर्तीला काही अर्थ उरत नाही.
त्यामुळे आपण जेव्हा मुर्तीचं अनावरण करतो तेव्हा वचन घेतो की, ते ज्यासाठी लढले, ज्या पद्धतीने लढले ते आपण त्यांच्याएवढं नाही पण आपण थोडतरी थोडं तरी केलं पाहिजे," असं म्हणत राहुल गांधी यांनी आपण शिवाजी महाराजांचे विचार थोडे तरी आत्मसात करायला पाहिजेत असंही म्हटलं.
दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) यां संविधान आणि शिवाज महाराज यांचं थेट कनेक्शन कसं आहे हे देखील सांगितलं. ते म्हणाले, शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) देशाला आणि जगाला काय संदेश दिला तर सर्वात पहिलं त्यांनी सांगितलं की देश सर्वांचा आहे. या देशात कोणावरही अन्याय करायचा नाही.
त्यांचे जे विचार आहेत, त्याचं आजच्या काळात कोणतं चिन्ह आहे तर ते संविधान आहे. असं म्हणत त्यांनी संविधानाची (Constitution) प्रत हातात घेऊन हात उंचावत ती सर्वांनी दाखवली. शिवाय हातात संविधानाची प्रत धरून ते पुढं म्हणाले, शिवाजी महाराजांच्या विचाराचं आज कोणतं चिन्ह आहे तर ते हे (संविधान) आहे. त्यांच्या विचारांचं हे थेट कनेक्शन आहे.
जे महाराजांनी सांगितलं त्याचं 21 व्या शतकातील ट्रान्सलेशन म्हणजे संविधान आहे. यामध्ये अशी एकही गोष्ट मिळणार नाही, ज्यासाठी महाराज लढले नाहीत. त्यांच्या विचारांच हे संविधान आहे. जर शिवाजी महाराज, शाहू महाराज असे लोक नसते, तर हे संविधानच नसतं. हेचं त्यांचं आणि संविधानाचं थेट कनेक्शन आहे, असं राहुल गांधींनी यावेळी म्हणाले.
राहुल गांधींच्या भाषणावेळी स्टेजवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख नेते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.