Flood
Flood Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात 9 जण धरणाच्या पुरात अडकले

सरकारनामा ब्युरो

जळगाव - राज्यात मागील 15 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील बऱ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक नदी, धरण, डोंगराळ प्रदेशात जात आहेत. हेच पर्यटन काही जणांच्या जीवावर बेतत आहे. असाच प्रकार जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात घडला आहे. ( In Jalgaon district, 9 people were trapped in the dam flood )

जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुकी नदीवरील गारबर्डी धरणात पर्यटनासाठी गेलेले नऊ जण अचानक पाण्याचा लोढा वाढल्याने पुरात अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासन तसेच स्थानिक नागरिक प्रयत्नशिल आहेत.

जळगाव जिल्हयात सद्या सतंतधार पाऊस सुर आहे. त्यामुळे नद्या ओसडूंन वाहन आहेत. तर धरणेही भरली आहेत. रावेर तालुक्यातील सुकी नदीवरील गारबर्डी धरण भरले आहेत. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यंटकांची गर्दी वाढली आहे. आजही या ठिकाणी पर्यंटकांची गर्दी होती. पर्यटक नदीपात्रात जावून थेट पूराचा आनंद घेत होते. मात्र अचानक नदीत पुराचे पाणी वाढल्याने आठ ते नऊ जण अडकले त्यांना बाहेर पडणेही कठीण झाले.

त्यांनी एका दगडाचा आश्रय घेतला असून ते मदतीची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र पुराचे पाणी वाढत असून अंधारही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना मदत करणे कठीण झाले आहे.प्रशासनाने यासाठी एनडीआरएफची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT