नाशिकला पाण्याचा महापूर...मराठवाड्यासाठी आनंदाचा पूर!

नांदूरमधमेश्‍वर प्रकल्पातून जायकवाडीसाठी मधून ७२ हजार क्युसेकचा विसर्ग
Flood in Godawari river
Flood in Godawari riverSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात रविवारपासून संततधार सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील या दमदार पावसामुळे जिल्हातील धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. गंगापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे गोदावरील पूर आला आहे. नांदूरमधमेश्वर प्रकल्पातून ७२ क्युसेक विसर्ग असल्याने जायकवाडी प्रकल्पासाठी तो दिलासा ठरला आहे. (Relief for Marathwada & Jaikwadi Irrigation project due to heavy rains in Nashik)

Flood in Godawari river
मला मंत्री करा, असे एकनाथ शिंदेंना कधीही म्हटलो नाही!

दरम्यान जिल्ह्यात अजून तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पूरस्थिती उद्बवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, नदीकाठावर जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Flood in Godawari river
रविकांत तुपकरांच्या धडक आंदोलनाने महावितरण हादरले!

गंगापूर धरणातून १० हजार ३५, दारणातून १५ हजार ५७२, तर नांदूरमधमेश्‍वरमधून ६९ हजार ५६२ क्युसेसने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नाशिकमधील होळकर पुलाखालून १३ हजार ४२३, ठेंगोडा बंधाऱ्यातून २८ हजार १०० क्युसेस विसर्ग सुरु आहे. पालखेड धरणाचे १४ दरवाजे २ फुटाने उचलून २२ हजार ५०० क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. चणकापूरमधून दुपारी सुरु करण्यात आलेला २३ हजार ६६५ क्युसेस विसर्ग कमी करत २१ हजार २७२ क्युसेसपर्यंत आणण्यात आला आहे. याशिवाय कडवामधून ६ हजार ७१२, गिरणा नदीतून २७ हजार क्युसेस, पूनंदमधून १० हजार २६५ क्युसेस विसर्ग सुरु होता.

सप्तशृंगगडावर ढगफुटी

महालपाटणे (ता. देवळा) गावाला पुराचा धोका वाढला असून पेठ तालुक्यात एक जण नाल्याच्या पुराच्या पाण्यात बुडाला आहे. त्याचा दुपारपासून शोध सुरु आहे. वणी येथील सप्तशृंगीदेवी गडावर ढगफुटी होऊन गडाच्या पायऱ्यावर पाण्याचा लोंढा आला. ढगफुटीमध्ये निर्मलाबाई नानू नाईक (वय ४४, रा. एरंडोल), पल्लवी लक्ष्मण नाईक (रा. एरंडोल), आशिश तरारे (वय २३, रा. नागपूर), मनीष राऊत (वय ३२, रा. नागपूर), शालू वासुदेव अवचट (रा. सप्तशृंगीदेवी गड) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करुन वणी येथे पाठवण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथक मातीच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे की नाही, याचा शोध घेत आहेत. पथकाचे उपप्रमुख मंगेश केदारे, कर्मचारी, ग्रामस्थ आदींचा त्यात समावेश आहे. रेल्वेसह वाहतुकीवर पावसाचा विपरित परिणाम झाला आहे. नाशिक महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ आणि गाडगे महाराज धर्मशाळा येथे गोदावरीच्या पुरात अडकलेल्या ६५ जणांची महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.

एका रात्रीत १७ टक्के पाणी साठा

जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम अशा २४ धरणांमधील जलसाठा ४६ वरून एका रात्रीत ६३ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. गेल्यावर्षी याच कालखंडात २७ टक्के जलसाठा होता. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ६७ टक्क्याच्या पुढे पोचला आहे. गंगापूर समुहातील धरणांत काश्यपी ४९ टक्के, गौतमी ५७ टक्के, आळंदी ८५ टक्के तर समुहात एकुण ६३ टक्के साठा आहे. पालखेड समुहातील धरणांचा साठा ८२ टक्के, ओझरखेड प्रकल्पात ८८ टक्के तर दारणा समुहात ६५ टक्के साठा आहे. मुसळधरा पावसामुळे या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यात नांदूरमधमेश्वर प्रकल्पातून ७ हजार २१७ क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी (पैठण) प्रकल्पासाठी ही आनंदवार्ता ठरली आहे.

जिल्ह्यातील पाऊस

गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस (मिलीमीटर) असा, (कंसात सरासरी) : कळवण-९४.१ (१९२.५), सुरगाणा-२३९.८ (१६२.५), दिंडोरी-९९.३ (२२२.३), इगतपुरी-९९.२ (५६.९), पेठ-१८७.६ (१७५.७), त्र्यंबकेश्‍वर-१६८ (१०३.५), मालेगाव-२४.९ (१८७.८), बागलाण-३५.७ (१६५.७), नांदगाव-१६ (१५०.४), नाशिक-५९.८ (१२३.७), निफाड-४५.३ (१५०), सिन्नर-१०.४ (१११.९), येवला-३०.४ (१०२.७), चांदवड-५४.२ (२०१.४), देवळा-२९ (१६३.७). अतिवृष्टीने कहर केलेल्या मंडलामध्ये चोवीस तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे : कळवण तालुका-कनाशी-१२५.५, दळवट-१२०.५, अभोणा-१२५.५. सुरगाणा तालुका-उंबरठाण-२७७.३, बाऱ्हे-२१६.३, बोरगाव-२२१.३, मनखेड-२०६.८, सुरगाणा-२७७.३. नाशिक-मखमलाबाद-९०.५. दिंडोरी तालुका-उमराळे-१०५.३, ननाशी-२१२.५, कोशिंबे-१२८. इगतपुरी तालुका-घोटी-१२९.५, इगतपुरी-१२९.५, धारगाव-१२९.५. पेठ-जोगमोडी-१९९.३, कोहोर-१८१.३, पेठ-१८१.८. त्र्यंबकेश्‍वर तालुका-वेळुंजे-१६८, हरसूल-१६८, त्र्यंबकेश्‍वर-१६८.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com