Nilesh Lanke
Nilesh Lanke  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke News : येत्या महिना दीड महिन्यात पुन्हा आपलेच सरकार येणार; लंकेंच्या विधानाने चर्चांना उधाण

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : येत्या महिना दीड महिन्यात पुन्हा आपलेच सरकार येणार असल्याचे विधान राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे. अहमदनगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या सरपंचपदाच्या पदभार कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड करत भाजपबरोबर हात मिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा रंगू लागली आहे.

यावेळी आमदार लंके म्हणाले, ''आधी आमचे सरकार होते तेव्हा आम्ही कधी सत्तेचा गैरवापर केला नाही. पण भाजपचे (BJP) सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला. ज्यावेळी आमची सत्ता होती त्यावेळी मी कोणाचाही राग-राग केला नाही.

सर्वच गावांना निधी देण्यासाठी प्रयत्न केला. हे गाव माझ्या मतदारसंघात नसताना देखील 20 लाखांचा निधी दिला. मात्र, आता आमची गावामध्ये सत्ता आलीय. पण राज्यात सत्ता नाही. पण येत्या महिना दीड महिन्यात पुन्हा आपलेच सरकार येईल'', असं आमदार लंके म्हणाले.

दरम्यान, आमदार निलेश लंके यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. तसेच चिचोंडी पाटील गावच्या सरपंचपदाच्या पदभार कार्यक्रमामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाधयक्ष घनश्याम शेलार यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्ये उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT