Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी पाटणमधून निवडून येऊन दाखवावे : शंभूराज देसाईंचे आव्हान

Shivsena शिवसेनेच्या युवासेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते.
Aditya Thackeray, Shambhuraj Desai
Aditya Thackeray, Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

Satara News : एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी शिवसेनेला दोन दिग्गज नेत्यांना विधान परिषदेवर घ्यावे लागले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना Eknath Shinde आव्हान देणे हे हस्यास्पद आहे. शिंदे साहेब लांब राहिले. त्यांनी आमच्या पाटण विधानसभा मतदारसंघात येऊन निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी आदित्य ठाकरेंना Aditya Thackeray दिले आहे.

शिवसेनेच्या युवासेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते. मख्यमंत्र्यांनी वरळी मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर आज साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना खुले प्रतिआव्हान दिले आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत असतात. आता त त्यांनी वरळी मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी निवडून येऊन दाखवावे,असे आव्हान दिले आहे. मुळात आदित्य ठाकरेंना निवडून यायला तेथील विद्यमान आमदार सुनील शिंदेंचे तिकिट कट करावे लागले होते. त्यावेळी सुनील शिंदेंना व सचिन अहिर या दिग्गजांना विधानपरिषदेवर घ्यावे लागले.

Aditya Thackeray, Shambhuraj Desai
Satara : बाळासाहेबांची शिवसेना, भाजप एकत्र बसून पराभवाची कारणे शोधणार : शंभूराज देसाई

एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी दोन आमदारक्या पक्षाला द्याव्या लागल्या. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणे हस्यास्पद आहे. शिंदे साहेब लांब राहू देत आम्ही कार्यकर्ते आहोत. पुन्हा निवडणुक लावायची तयारी असेल तर त्यांनी पाटणमध्ये येऊन विधानसभेची निवडणूक लढवावी, तसेच निवडून येऊन दाखवावे. ज्यांच्या मागे ५० आमदार व १३ खासदार आहेत, त्यांना आव्हान देण्याची भाषा करु नये. त्यांनी पाटणमध्ये येऊन निवडणकलढवावी व निवडुन येऊन दाखवावे. असे आवाहन मंत्री देसाई यांनी दिले.

Aditya Thackeray, Shambhuraj Desai
Delhi-Mumbai Express way : मुंबई-दिल्लीचे अंतर लवकरच १२ तासांचं; मोदी करणार 'या' टप्प्याचं उदघाटन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com