Bhausaheb Choudhary
Bhausaheb Choudhary Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

निष्क्रिय कार्यकर्त्यांना शिवसेनेतून लगेच बाजूला करा!

Sampat Devgire

कळवण : निष्क्रिय कार्यकर्त्यांना त्वरीत बाजूला करून येत्या आठ- दहा दिवसात नवीन कार्यकारणीची यादी द्या, अशा सूचना शिवसेनेचे (Shivsena) संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शुक्रवारी कळवण येथून आगामी जिल्हा परीषद, (ZP) पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्‍वभुमीवर गट- गणनिहाय बैठकीला सुरवात केली. बैठकीदरम्यान मागील सहा महिन्यात तालुक्यात कुठले पक्षिय कार्यक्रम झाले, याची माहिती घेतली.

अभोणा, मानूर, खर्डे दिगर, कनाशी गटातील उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, गट- गणप्रमुख, कळवण तालुकाप्रमुख व ग्रामीण जिल्हाप्रमुखांशी आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी उपाययोजना व गटातील अडीअडचणी संदर्भात चर्चा केली. मालेगाव बाह्य विधानसभा व नांदगाव विधानसभेचे उदाहरण देऊन संघटनेतून माणूस कसा सक्षम होतो व तोच माणूस कसा पुढे इतिहास घडवितो, याची माहिती दिली.

बैठकीत तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी तालुक्यातील पक्षसंघटनाबाबत माहिती दिली. आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय उपायोजना करावी, गण- गटातील अडीअडचणीसंर्दभात उपतालुकाप्रमुख डाॕ. दिनेश बागूल यांनी माहिती दिली. जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी निवडणुकांच्या तयारीसाठी तालुक्यातील आढावा व सुक्ष्म माहिती घेण्यासाठी पक्षिय तक्त्याची माहिती कशी भरावी, याबाबत मार्गदर्शन केले.

बैठकीला उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, तालुकाप्रमुख अंबादास जाधव, माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, शहरप्रमुख साहेबराव पगार, उपतालुकाप्रमुख दिनेश बागूल, विनोद भालेराव, तालुका संघटक संजय रौंदळ, विभागप्रमुख शितलकुमार आहिरे, पंकज मेणे, हिरालाल वाघ, माजी तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, माजी विभागप्रमुख नाना देवरे, अभोणा गणप्रमुख राजेंद्र चव्हाण, मधुकर मोरे, शहरप्रमुख राजेंद्र शिंदे, मानूर गणप्रमुख उत्तम मोरे, संदीप पाटील, खर्डेदिगर गणप्रमुख बाळासाहेब मोरे, प्रवीण निकम, कनाशी गणप्रमुख जयवंत मोरे, शहरप्रमुख अरिफ सय्यद, कळवण उप शहरप्रमुख आप्पा बुटे, कक्ष शहरप्रमुख किशोर पवार, युवासेना तालुका अधिकारी मुन्ना हिरे, शहर अधिकारी सुनील पगार, महिला आघाडी शहर संघटक सत्यवती आहेर, युवासेनेचे सचिन पगार, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक जाधव आदी उपस्थित होते.

मनसेच्या युवकांनी बांधले शिवबंधन

संपर्कप्रमुख श्री. चौधरी यांनी कळवण येथून आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर गट- गणनिहाय बैठकीला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार संघटक हेमंत हुलाहुळे यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. योगेश गोदरे, सचिन गवळी, प्रकाश पवार, अमोल पवार, दिनकर शिंदे, विजय गवळी, बापू पवार, रोशन गांगुर्डे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT