Nashik NCP news : बागलाण तालुक्यातील अवकाळी व गारपिटीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन सात दिवसात मदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला महिना झाला. मात्र एकाही शेतकऱ्याला अद्यापही मदत मिळाली नाही. त्यामुळे हे सरकार खाली खेचल्याशिवाय निवांत बसू नका असे आवाहन माजी आमदार संजय चव्हाण यांनी केले. ( NCP leader Sanjay Chavan criticize Shinde-Fadanvis Government)
नैराश्यातून कुणा शेतकऱ्याने (Farmers) आत्महत्या केल्यास त्याला राज्यातील (Maharashtra) शेतकरीविरोधी असंवैधानिक शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार जबाबदार राहील. आता या निष्क्रिय सरकारला घरी बसविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार संजय चव्हाण (Sanjay Chavan) यांनी केले.
बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील काकडगाव व मोराणे सांडस येथे गाव भेटीनिमित्त झालेल्या मेळाव्यात माजी आमदार श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामकाजाच्या पद्धतीवर टिका केली. या सरकारकडून जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. जनतेच्या कोणत्याही प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.
ते पुढे म्हणाले, सध्याच्या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्येचे वातावरण असून शेतकरी आत्महत्येकडे वळण्याची भीती आहे. असे झाल्यास त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. येत्या निवडणुकांमध्ये बळीराजा सध्याच्या शेतकरीविरोधी केंद्र व राज्यातील भाजप सरकारला घरी बसविणार असल्याचा दावाही श्री.चव्हाण यांनी केला.
श्री.चव्हाण म्हणाले, की गेल्या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसात बागलाण तालुक्यात हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली. महाराष्ट्र अवकाळीच्या संकटाशी सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ अयोध्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका होत असल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला. आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला महिना झाला तरीही तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित आहे.
तालुकाध्यक्ष श्री. मांडवडे म्हणाले, की केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवारांनी पीकविम्याच्या सर्व अटी-शर्ती आणि निकष शिथिल करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने शेतकरी सुखी समाधानी होता. मात्र सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने जाचक अटी शर्ती लावल्यामुळे विमा भरूनही बळीराजाला काहीही मिळाले नाही.
तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, सेवादलाचे तालुकाध्यक्ष यशवंत कात्रे, युवक तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, काकडगाव सोसायटीचे संचालक विनोद पाटील, तंटामुक्त अध्यक्ष देवराव अहिरे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.