IAS Pooja Khedkar 2 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचे नॉन क्रिमीलेअर वादात; आयकर विभागाकडून उत्पन्नाच्या कुंडलिचा शोध सुरू

Income inquiry of IAS Pooja Khedkar family : पूजा खेडकर आणि त्यांच्या आईवडिलांचे उत्पन्नाची चौकशी सुरू झाली आहे. आयकर विभागाला खेडकर कुटुबियांचे वार्षिक उत्पन्नाचा सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.

Pradeep Pendhare

IAS Pooja Khedkar : आयएएस होण्यासाठी पूजा खेडकर यांनी यूपीएससीची 11 वेळा परीक्षा दिली. ओबीसीतून परीक्षा देताना नॉन क्रिमीलेअरचा दाखला दिला. आता या दाखल्याची चौकशी जिल्हा महसूल प्रशासनाने सुरू केली आहे.

पूजा खेडकर आणि त्यांच्या आईवडिलांचे उत्पन्न शोधण्यासाठी आयकर विभाग सरसावला आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी खेडकर कुटुंबियांच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती जमा करून केंद्र सरकारला अहवाल देणार आहे. ही चौकशी कशी असेल आणि अहवालात काय असेल याची चर्चा आहे.

प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी चांगल्याच वादात सापडल्या आहेत. केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने याची गंभीर दखल घेतली. पूजा खेडकर आणि त्यांच्या आईवडिलांविषयी रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे कुटुंब वादात सापडले आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीला (UPSE) देखील गंडवल्याचे समोर आले. पूजा खेडकर यांनी 11 वेळा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी दोन वेळा नाव बदलले. तसेच 9 वेळा ओबीसीतून परीक्षा दिली. त्यासाठी त्यांनी नॉन क्रिमीलेअरचा दाखला दिला. या दाखल्यावरील उत्पन्न आणि प्रत्यक्षातील खेडकर कुटुंबियांचे उत्पन्न आता संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.

पूजा खेडकर यांच्या आईने एका शेतकरी कुटुंबियाला पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्या पसार आहेत. पिस्तुल परवाना निलंबनाची नोटिस देखील पुणे (PUNE) येथील निवासस्थानी पोलिसांनी दिली आहे. असे अनेक वाद असतानाच पूजा खेडकर यांनी ओबीसीतून यूपीएससी परीक्षा देताना दिलेले नॉन क्रिमीलेअरचा दाखल्यावरील उत्पन्नाची चौकशी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आयकर विभागाला सखोल चौकशी करून खेडकर कुटुंबियांचे सर्व वार्षिक उत्पन्न सादर करण्याचा आदेश दिला आहे. पूजा खेडकर यांचे आईवडील तांत्रिकदृष्ट्या विभक्त दाखवले असले, तरी दोघांचे उत्पन्न तपासले जाणार आहे. पूजा खेडकर यांच्या नावावर देखील कोट्यवधीची मालमत्ता असल्याचे समोर येत आहे. त्याची देखील चौकशी होणार आहे.

नॉन क्रिमीलेअर खरे की खोटे?

पूजा खेडकर यांच्याशी निगडीत वादाची चौकशी केंद्र सरकारचे अतिरीक्त दर्जाचे सचिव करत आहे. या सचिवांकडे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आपला अहवाल सादर करणार आहेत. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेसाठी नॉन क्रिमीलेअर पाथर्डी महसूल विभागातून काढले होते. यात 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न दाखवण्यात आले आहे. तर आयटीआर भरताना दाखवलेल्या उत्पन्नांचे काय करायचे, ही सर्व प्रश्नांची उत्तरं चौकशीतून समोर येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT