Video IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर प्रकरणात पोलिस महासंचालकांनी घातले लक्ष, दिले मोठे निर्देश !

Pooja Khedkar Vs Goverment : पूजा खेडकर यांनी त्या वापरत असलेल्या खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावला होता. त्याची दखल घेण्यात आली असून मोटारीवर अंबर दिवा लावल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
Pooja Khedkar- Rashmi Shukla
Pooja Khedkar- Rashmi ShuklaSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. पूजा खेडकर प्रकरणात पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी लक्ष घातलं आहे. खासगी मोटारीवर लाल-निळ्या अंबर दिव्याचा केलेला वापर,खेडकर यांच्या आईनं शेतकऱ्याला पिस्तुलाचा दाखविलेला धाक आणि त्यांनी मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्र या सर्व प्रकारांचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी मागवला आहे.

आपल्या मनमानी कारभारामुळे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी गेल्या वर्षी मुळशी येथील एका शेतकऱ्याला पिस्तुलचा धाक दाखवून दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह इतर काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खेडकर यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्यांनी अटी आणि शर्तींचा भंग केल्याप्रकरणी पोलिस (Police) आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावित खुलासा करण्यास सांगितले आहे. योग्य तो खुलासा न केल्यास शस्त्र परवाना रद्द होऊन त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते. त्यातच आता राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाकडून देखील या प्रकरणाचा अहवाल मागविण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांनी हा अहवाल मागविला आहे.

Pooja Khedkar- Rashmi Shukla
Pankaja Munde : IAS पूजा खेडकर प्रकरणात पंकजा मुंडेंचा इशारा; म्हणाल्या, 'कायदेशीर नोटीस...'

प्रशिक्षणार्थी आयएएस (IAS) असताना पूजा खेडकर यांनी त्या वापरत असलेल्या खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावला होता. त्याची दखल घेण्यात आली असून मोटारीवर अंबर दिवा लावल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. तसेच त्यांच्या गाडीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने जो दंड लावण्यात आला होता. तो देखील त्यांच्याकडून वसुल करण्यात आला आहे.

Pooja Khedkar- Rashmi Shukla
IAS Pooja Khedkar : वादात सापडलेल्या 'ओम दीप' बंगल्याला कुलूप अन् तेही 'सिंहा'चं! गेल्या मनोरमा खेडकर कुठे?

भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) पात्र होण्यासाठी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते. यासाठी त्यांनी वेगवेगळी दिव्यांग प्रमाणपत्रे मिळविल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिव्यांग संघटनेने राज्य अपंग कल्याण आयुक्त डॉ. प्रवीण पुरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी देखील दिव्यांग संघटनेकडून अपंग कल्याण आयुक्तांकडे करून तक्रार अर्ज देण्यात आला होता. संबंधित प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. अशा गैरप्रकारांमुळे पात्र दिव्यांग उमेदवार सुविधांपासून वंचित राहतात, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर डॉ. पुरी यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी,अशी सूचना केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com