IT Reids in Nandurbar

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

सत्ताधारी पक्षाशी संबंधित बिल्डर्स लॉबीकडे `प्राप्तिकर`चे छापे

शहरातील विविध बांधकाम व्यावसायिकांकडे प्राप्तिकर खात्याच्या पथकाने दिवसभर ठाण मांडले.

Sampat Devgire

नंदुरबार : नंदुरबार शहरातील १२ व्यावसायिकांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकाने (Income tax reids) छापे टाकले आहेत, तर अक्कलकुवा व लगतच्या गुजरातमधील वेळदा येथील एकाकडे प्राप्तिकर विभागाच्या पथकाने दिवसभर ठाण मांडून तपासणी केली. शहरात वेगवेगळ्या जिल्ह्यातील पासिंगची वाहने गिरक्या घालत होती. या धाडीत बिल्डर्स लॉबीतील (Builders lobby) मोठमोठ्या हस्तींची नावे आहेत.

तपासणी करण्यात आलेले सर्व व्यावसायिक एकमेकांशी कनेक्टेड असल्याची माहिती आहे. शहरातील बिल्डर्स, जमीन व्यावसायिक, व्यापाऱ्यांचे या छाप्यांनी धाबे दणाणले आहे. दिवसभर अनेक प्रतिष्ठाने बंदच राहिली.

आजची पहाट काही बिल्डर्स व जमीनमाफियांकडे प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळेस धाड टाकल्याचा चर्चेने उगवली. प्राप्तिकरच्या धाडीची वार्ता शहरात पसरताच शहरातील मोठमोठ्या घोटाळेबहाद्दरांचे धाबे दणाणले. अनेकांनी मोबाईल बंद करत आपली कार्यालये, घरे बंद करून बाहेरगावी निघून जाणे पसंत केले. शहरातील काही नामांकित बिल्डर्सच्या घरी मात्र प्राप्तिकर विभागाच्या पथकाने दिवसभर ठाण मांडून तपासणी केली. शहरात सकाळपासूनच नाशिक, मुंबई, औरंगाबाद, गुजरात पासिंगची २० ते २५ वाहने घिरट्या घालत होती. त्यामुळे समजलेल्या नावांप्रमाणे खात्री करण्यासाठी अनेक जण बिल्डर्सची कार्यालये, बंगले परिसरात जाऊन पाहण्यासाठी गर्दी करत होते.

त्यानुसार अनेक बिल्डर्सकडे दोन ते चार वाहने, बंगल्याचे गेट बंद, बाहेर पोलिस पहारा तैनात व काही अधिकाऱ्यांची पथके दिसून आली. त्यात शहरातील किमान दहा ठिकाणी अशी तपासणी सुरू होती. त्याचबरोबर अक्कलकुवा येथेही एका व्यापाऱ्याकडे, तर नंदुरबार शहरालगत असलेल्या गुजरातमधील वेळदा या गावातही एक पथक पोचले होते. पथक मिळालेल्या माहितीनुसार गुगल मॅपद्वारे त्या-त्या बंगल्यांपर्यंत पोचत होते. मात्र याबाबत अधिकृत माहिती देणे टाळले. कारवाईचे गूढ गुलदस्त्यातच आहे. मात्र या कारवाईमुळे शहरातील मोठमोठे व्यापारी आपली प्रतिष्ठाने बंद करून नॉट रिचेबल झाले होते.

एकाच राजकीय पक्षाशी कनेक्टेड नावांची चर्चा

आजची कारवाई ही एका सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित बिल्डर्स लॉबीवर झाली आहे. भविष्यात राजकारणात जोमात उतरण्याच्या तयारीत असलेल्या एका बिल्डरचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे ही कारवाई टार्गेट केलेली तर नाही ना, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच बिल्डर्सशी संबंधित इतर व्यक्तींकडेही प्राप्तिकर विभागाची पथके धडकली होती. त्यामुळे यात राजकारण तर नाही ना, अशी चर्चा आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT