Sudhir Tambe Vivek Kolhe sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Teacher Constituency : 'तालीम' सुधीर तांबेंची, आमदारकीसाठी 'डाव' टाकलाय विवेक कोल्हेंनी!

Nashik Teacher Constituency Election : सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर म्हणून अपक्ष लढा देत विजय मिळवला. हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामागे डाॅ. सुधीर तांबे यांची कमाल होती. नाशिक शिक्षकसाठी विवेक कोल्हे यांनी सत्यजित तांबे यांचा मार्ग स्वीकारला आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शन घेऊनच नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या मतदारसंघात आमदारकीसाठी विवेक कोल्हे उतरल्याचे निश्चित झाले आहे. सुधीर तांबेच्या तालमीतील मिळालेला डाव फेल जाणार नाही आणि आमदारकीत विजय निश्चित होईल, असा विवेक कोल्हे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपचे (BJP) युवा नेते विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी भरला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात ज्येष्ठ नेते माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी प्रतिनिधीत्व केलेले आहे. यंदा मात्र काँग्रेस उमेदवारी मिळत असताना देखील त्यांनी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांना अपक्ष उमेदवारी करायला लावली आणि सुधीर तांबे यांनी उमेदवारी केली नाही.

सत्यजित तांबे यांनी शिवसेनेच्या उपनेत्या आणि महाविकास विकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. सत्यजित तांबे यांनी अपक्ष लढत विजय मिळवला. हा प्रयोग नाशिक पदवीधरसाठी यशस्वी झाला. त्यामागे डाॅ. सुधीर तांबे यांची कमाल होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे सुधीर तांबे मेहुणे आहेत. सहाजिक सर्व राजकीय गणिते जुळवून आणत सत्यजित तांबेंसाठी विजय खेचून आणण्यात सुधीर तांबे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता विवेक कोल्हे यांनी सुधीर तांबे यांचे मार्गदर्शन घेतल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे सुधीर तांबे यांच्या तालमीतून मिळालेला डाव विवेक कोल्हे यांना आमदारकीपर्यंत घेऊन जाणार की नाही, अशी चर्चा रंगली आहे. यातच भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वाद मिळाल्याने विवेक कोल्हे यांनी निवडणुकीला विश्वासाने समोरे जाण्याचे धाडस दाखवले आहे.

दरम्यान, या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. विद्यमान आमदार किशोर दराडे उमेदवारीसाठी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. पदवीधरमधून निवडणूक लढणाऱ्या शुभांगी पाटील पुन्हा एकदा नाशिक शिक्षकसाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्या ठाकरे पक्षाच्या संपर्कात आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून ही निवडणूक विवेक कोल्हे यांना कस लावणारी ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT