MLC Election 2024 : विधान परिषदेची निवडणूक शिक्षकांच्या हातून निसटली, आता रंगणार राजकीय आखाडा?

Nashik Teacher Constituency Election 2024 : निवडणुकीत शिक्षक लोकशाही आघाडी 'टीडीएफ' या संघटनेची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, एकमत न झाल्याने या संस्थेने ही निवडणूक आपल्या हातून घालवली आहे.
shubhangi patil vivek kolhe
shubhangi patil vivek kolhesarkarnama

Nashik News, 28 May : विधान परिषदेच्या ( MLC Election 2024 ) नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत वर्षभर प्रयत्न करूनही शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) एकसंघ राहू शकली नाही. त्यामुळे शिक्षकांची निवडणूक पुन्हा एकदा राजकीय नेते अर्थात संस्था चालकांच्या हाती गेली आहे.

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ( Nashik Teacher Constituency Election 2024 ) येत्या 26 जूनला होत आहे. या निवडणुकीची प्रक्रिया 31 मे पासून सुरू होत आहे. पाच जिल्ह्यांच्या या निवडणुकीत उमेदवारीसाठी अतिशय वेगाने हालचाली होत आहेत. यामध्ये शिक्षक लोकशाही आघाडी 'टीडीएफ' या संघटनेची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, एकमत न झाल्याने या संस्थेने ही निवडणूक आपल्या हातून घालवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिक्षक लोकशाही आघाडीने प्रारंभी काँग्रेसचे संदीप गुळवे ( Sandeep Galve ) यांना उमेदवारी जाहीर करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. पण, यासंदर्भात आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी शिक्षक ही संस्था चालक यावरून मतभेद झाले. त्यामुळे एका गटाने गुळवे यांना तर दुसऱ्या गटाने भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केली. आता त्याही पुढे जात तिसरा गट तयार झाला आहे. हा गट नवा उमेदवार जाहीर करण्याची तयारी करीत आहे.

या सगळ्यांचा परिणाम म्हणजे शिक्षक लोकशाही आघाडीच्या हातून ही निवडणूक निसटली आहे. आता विविध संस्थाचालक तयारीला लागले आहेत. यामध्ये कोपरगावचे विवेक कोल्हे ( vivek Kolhe ) आघाडीवर आहेत. त्यांचे समर्थक पाचही जिल्ह्यात शिक्षकांच्या भेटी घेऊन चाचपणी करीत आहेत. संदीप गुळवे हे नाशिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी आहेत. ते नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक देखील आहे. याशिवाय मातोश्री शिक्षण संस्थेचे संचालक आणि विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी यापूर्वीच उमेदवारी करण्याचे जाहीर केले आहे. मालेगाव येथील आर. डी. निकम हे देखील उमेदवार आहेत.

shubhangi patil vivek kolhe
Nashik Division Teacher Constituency Election : उमेदवार शिक्षक की संस्थाचालक यावरून रंगणार 'राजकारण'

सर्व उमेदवारांच्या भाऊ गर्दीत शिवसेनेच्या उपनेत्या आणि नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीत 49 हजार मते मिळालेल्या शुभांगी पाटील ( Shubhangi Patil) या एक प्रबळ उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. किमान दहा ते पंधरा हजार शिक्षकांची आपल्या व्यक्तिगत संपर्क आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची आपण संपर्क केला आहे. त्यामुळे आपल्याला ही निवडणूक सोपी असल्याचा दावा पाटील यांनी केला.

शिक्षक संघटनेतील फूट राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांना लाभदायी ठरली आहे. आता उमेदवार कोण याचा निर्णय संस्थाचालक ठरवणार आहेत. शिक्षकांवर देखील संस्थाचालक अर्थात राजकीय नेत्यांचा प्रभाव असतो. त्यामुळे सोयीनुसार विविध राजकीय नेते एकत्र येऊन या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवणार हे स्पष्ट झाले आहे. त्यात महाविकास आघाडीला मोठी संधी निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राजकीय आखाडा होतो की काय, अशी स्थिती आहे.


( Edited By : Akshay Sabale )

shubhangi patil vivek kolhe
Nashik Teacher Constituency Election : शिक्षक एकवटले, 'टीडीएफ'चे पदाधिकारी अन् त्यांचा उमेदवारही अनधिकृत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com