Uddhav Thackeray On Bjp Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray On Bjp : "इंडिया म्हटलं की, काहींना खाज सुटायला लागते..." ; उद्धव ठाकरेंनी काढला चिमटा !

Uddhav Thackeray Criticize On PM Narendra Modi : 'पोलादी पुरुष नाही, हे तर तकलादू पुरुष,' मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका..

Chetan Zadpe

Jalgaon News : जळगावात छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळा अनावरणाबाबत शासनाने स्थगिती दिल्यानंतरही शिवसेना ठाकरे गटाकडून अनावरण करण्यात येत आहे. या स्थगितीला न जुमानता पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्यांचे अनावरण झाले. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. (Latest Marathi News)

ठाकरे म्हणाले,"पुतळा किती उंच केला, यापेक्षा कामाची उंची महत्त्वाची आहे. कामाची उंची कधी गाठणार? सरदार वल्लभभाईंनी जे काम केलेलं आहे, तशी उंची गाठा. सरदारांच्या ताठ बाण्यामुळे मराठवाडा स्वतंत्र होऊन भारतात आला. आता भारत बोललंच पाहिजे. काहींना आता इंडियाची अॅलर्जी झाली आहे. इंडिया म्हटलं की, काहींना खाज सुटायला लागते. आतापर्यंत त्यांनी इंडियाचा गवगवा केला अन् आपण इंडिया असं नाव घेतल्यानंतर यांना खाज सुटली."

ठाकरे पुढे म्हणाले, "सरदारांनी निजामांच्या राज्यात फौजा घुसवून मराठवाडा मुक्त करून घेतला. मात्र, मणिपूरमध्ये अत्याचार होत असताना आताच्या सरकारला फौजा घुसवून कारवाई करता आली नाही. सरदार पोलादी पुरुष होते, हे तकलादू पुरुष आहेत," अशा शब्दांत ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT