Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shinde Government : शिंदे सरकारच्या तिजोरीत खडखडाट? धनादेश रोखले!

आर्थिक वर्षे नुकतेच संपले, यावेळी तयार केलेल्या धनादेशांचे वितरण सरकारने थांबवले

Sampat Devgire

Maharashtra Government News : राज्य सरकारने जिल्हा परिषद व ट्रेझरी शाखांनी तयार केलेले धनादेश वितरीत करू नये अशा तोंडी सुचना दिल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली असुन राज्य सरकार आर्थिक विवंचनेत सापडल्याचे बोलले जाते. (Finance department issued order not distribute Cheques)

महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातील देणी देण्यासाठी मार्चअखेर (Budget) अतिशय वेगाने काम केले. ऑनलाईन काम करताना मुदत संपल्याने उर्वरीत देणी देण्यासाठी धनादेश तयार करण्यात आले होते. मात्र ते वितरीत करू नये अशा सुचना राज्यातील जिल्हा परिषदांना (Zillha Parishad) देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद व इतर विभागांना वितरित केलेल्या निधीतून झालेल्या कामांची बीले मार्च अखेरीस प्रशासनाकडे सादर झाले आहेत. ही मंजुर झालेली देयके त्या त्या विभागांना वितरीत झाली. कोषागार कार्यालयाने त्याचे धनादेश तयार केले आहेत. धनादेश मिळावेत म्हणून कंत्राटदार सातत्याने कार्यालयात पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना धनादेश वितरीत केले जात नाहीत.

राज्य सरकारकडून धनादेश वितरित न करण्याचे आदेश असल्यामुळे राज्यभरातील ठेकेदारांचे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतील जवळपास २२०० कोटी रुपये अडकून पडले आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतील देयकांचे धनादेश थांबवले असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेची माहिती समोर आली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य यंत्रणांनाही मागणीच्या तुलनेत अतिशय कमी निधी प्राप्त झाल्याची तक्रार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट तर नाही ना? अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.

जिल्हा नियोजन समितीने संबंधित यंत्रणांना बीडीएस प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यास मान्यता दिली, पण देयकांची संख्या अधिक असल्याने त्या देयकांचे धनादेश एप्रिलमध्ये दिले जातील, असे संबंधितांना कळवले. सर्वच जिल्ह्यांच्या कोषागार कार्यालयानी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात धनादेश तयार करून ठेवले आहेत. मात्र, या कोषागार कार्यालयानी हे धनादेश संबंधित विभागांना अद्याप पाठवले नाहीत. या विभागांकडून मागणी केल्यास सरकारकडून धनादेश देऊ नये, अशा सूचना असल्याची उत्तरे दिली जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT