Raju Shetty On NDCC Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या बेकायदा वसुली विरोधात मी स्वतः बिऱ्हाड आंदोलन केले होते. तेव्हा पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर आंदोलन झाले होते. त्यावेळी लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले गेले. मात्र कार्यवाही झालेली नाही. (Auctioning Farmer`s land for tax collection is wrong)
नाशिक (Nashik) जिल्हा बँकेकडून थकीत कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या (Farmers) जमीनींचे लिलाव केले जात आहेत. याबाबत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्याचा त्यांना विसर पडल्याची टिका माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली.
जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या जमीनीचे लिलाव करते. त्याविरोधा पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर स्वाभीमानी शेतकरी संघटनतर्फे बिऱ्हाड आंदोलन केले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे जिल्हा बँकेत देखील एकवेळ समझोता योजना (ओटीएस) आणू असे सहकारमंत्र्यांनी सांगितले होते.
शेट्टी म्हणाले, पालकमंत्र्यांनी देखील याबाबत मार्ग काढू असे आश्वासन दिले होते. मात्र तसे काहीच झाले नाही. राजकिय नेत्यांनी बँक लुटली ते नामनिराळे झाले. मात्र ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून कष्टाने शेतमाल पिकवला त्याला व्यापाऱ्यांनी फसवलं, दर मिळाले नाहीत, आता त्या शेतकऱ्याच्या जमिनी लिलावात निघत आहेत. ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे.
राज्य सरकारला वेळोवेळी याची जाणीव करून दिली आहे.आता सरकारने अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेला एक हजार कोटी रूपये दहा वर्षांकरिता द्यावेत. त्यातून बँक सुरळीत होईल, असे राज्य सरकारला सुचवले असल्याचेही राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.