Sushma Andhare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सुषमा अंधारे दहशतवादी आहेत काय?

शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून दडपशाहीचा आरोप

Sampat Devgire

धुळे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना शिवसेना पक्षाच्या (Uddhav Thackrey) महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर असताना श्रीमती अंधारे यांच्या धरणगाव, पाचोरा, पारोळा, चोपडा या ठिकाणच्या सभा शांततेत झाल्या. असे असताना मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेसाठी जळगाव पोलिसांकडून ऐनवेळी परवानगी नाकारून (Police refuse permission) एका हॉटेलात स्थानबद्ध केले व त्यांना सभेत भाग घेण्यास मज्जाव केला. (Shivsena leaders blaim Jalgaon police for a wrong treatment to Sushma Andhare)

सुषमा अंधारे यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला पोलिसांनी घेराव टाकला. त्या बाहेर पडल्यावर त्यांच्या गाडीभोवती पाचशे पोलिसांनी गराडा घातला. हा सर्व प्रकार निंदनीय असून, श्रीमती अंधारे यांना दहशतवादी असल्याप्रमाणे पोलिस प्रशासनाने वागणूक दिली.

शिवसैनिक शरद कोळी यांनाही जळगाव जिल्ह्यातून हुसकावून लावत सभेत भाग घेण्यास परवानगी दिली नाही. संविधानानुसार विरोधी पक्षाला आपले विचार मांडण्याचे पूर्णतः स्वातंत्र्य असताना जळगाव पोलिसांकडून अरेरावी पद्धतीने या दोन्ही नेत्यांच्या सभेवर बंदी घालण्याचा प्रकार राज्याच्या संस्कृतीला शोभणारा नाही. या प्रकाराचा शिवसेना महानगर शाखेतर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदन दिले.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देवीदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक नितीन शिरसाठ, गुलाब माळी, भरत मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT