सावरकरांच्या जन्मभूमीत राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांची खोक्यांसह तिरडी काढली!

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे नाशिकला तासाभरातच तीव्र राजकीय पडसाद उमटले.
NCP agitation at Bhagur
NCP agitation at BhagurSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : शिंदे सरकार (Eknath Shinde Government) मधील गद्दार कृषीमंत्री (Agricultural Minister) अब्दुल सत्तार (Abdull Sattar) यांनी खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ Protest) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP) जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे (Prerana Balkawde) यांच्या नेतृत्वाखाली भगूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. सत्तार यांच्या वक्तव्यानंतर तासाभरातच अनेक ठिकाणी आंदोलने झाली. त्यामुळे सत्तार यांच्या विरोधात चांगलीच धग निर्माण झाली. (There was serious reactions in Nashik on Abdull Sattar`s coment on Supriya Sule)

NCP agitation at Bhagur
आमदार अशोक पवार यांचा पाचव्यांदा विक्रमी विजय; मोठ्या तयारीने उतरलेल्या भाजपला धक्का

यावेळी पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर येथे महिलांनी तीव्र आंदोलन केले. त्यानंतर नाशिक शहर, देवळा, निफाड, पिंपळगाव बसवंत, सटाणा, मालेगाव यांसह विविध ठिकाणी आंदोलन झाले.

NCP agitation at Bhagur
Bharat Jodo Yatra : तळपती मशाल हातात घेत राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल

यावेळी सौ. प्रेरणा बलकवडे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान करण्याचे बाळकडू आहे ५० खोके घेतलेले राज्याचे गद्दार अश्यामध्ये जर महिलांचा अवमान करत असतील तर त्यांच्या खोक्यांसह त्यांची तिरडी या राज्यातून काढल्याशिवाय आम्ही महिला रहाणार नाही “ असे वक्तव्य या वेळी प्रेरणा बलकवडे यांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केले. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधीकाऱ्यांनी सत्तारांच्या फोटोला जोडे मारुन काळे फासले व प्रतिकात्मक तिरडी काढली.

या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, संगिता झांजरे, अग्नेश गामा, राहूल कापसे, अल्का बेरड, रंजना चौधरी संगिता उमाप, विलास सहारे, राहूल जाधव, सुहास कंदारे आदिंसह असंख्य कार्यकरते उपस्थित होते

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com