BJP leader Chitra Wagh
BJP leader Chitra Wagh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नवी मुंबईतील खंडणीखोर मढवीला राज्य शासनाचे संरक्षण?

Sampat Devgire

मुंबई : नवी मुंबई (New Mumbai) येथील माजी नगरसेवक एम. के. मढवी याने जयश्री पाटील या महिलेने हफ्ता देण्यास नकार दिल्याने शिविगाळ करून धमकी दिली. मात्र अद्यापही त्याच्यावर कारवाई झालेली नाही. एकंदर राज्यात भयावह अशी स्थिती आहे. त्यामुळे त्याची शासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी भाजप (BJP) महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली.

मुंबईत पक्षाच्या कार्यालयात त्यांनी व्हीडीओवर ही प्रतिक्रीया रेकॉर्ड करून सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे. त्या म्हणाल्या, नवी मुंबई सेक्टर ५ मधील हफ्तेखोर आणि खंडणीखोर माजी नगरसेवक एम. के. मढवी याने गुंडगिरी आणि अन्यायाचा कळस गाठला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, सिंगल मदर असलेल्या जयश्री पाटील यांनी मसिक हफ्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या मढवी याने जयश्री पाटील व त्यांची मुलगी तृप्ती हीला अर्वाच्च शिवागाळ केली. एव्हढेच नव्हे तर मी काय आहे, हे दाखवून देईन अशी धमकी देखील दिली.

चित्रा वाघ यांनी याबाबत माहिती दिली. त्यात जयश्री पाटील या सिंगल मदर असुन स्वतःच्या परिवाराचा अतिशय कष्टाने उदरनिर्वाह चालवितात. हे करताना अशा समाजकंटक मढवी याच्याकडून त्यांना त्रास दिला जातोय. दादागिरी त्यांच्यावर केली जाते आहे. श्री. मढवी हे खोट्या अतिक्रमणाच्या कारवाई दाखवून लोकांकडून पैसे वसुल करतो. नवी मुंबई महापालिका याबाबत कान आणि डोळे बंद करून बसील आहे. विशेष म्हणजे या शिविगाळ व धमकीची लेखी तक्रार जयश्री पाटील परिवाराने नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. परंतु फक्त आणि फक्त राज्य सरकारच्या दबावामुळे अजुनही हा मढवी मोकाट फिरताना दिसतो आहे. त्यामुळे आमची मागणी आहे. मढवी याच्यावर तातडीने कारवाई करून त्याला अटक केली पाहिजे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT