<div class="paragraphs"><p>Sudhakar Badgujar &amp; Mukesh Shahane</p></div>

Sudhakar Badgujar & Mukesh Shahane

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

सत्तेत भाजप... अन् प्रभागरचना ठरतेय शिवसेना नेत्यांच्या घरात?

Sampat Devgire

नाशिक: नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Nashik NMC election) नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेच्या सभेत शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) व भाजप स्थायी समिती सदस्य मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांच्यातील खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे चित्र बघायला मिळाले.

महापालिका निवडणुकीत एखाद्या प्रतिस्पर्धी किंवा नगरसेवकाचा काया काढायचा असेल, राजकीय हिशेब चुकता करायचा असेल तर पडद्यामागे सुत्रे हलवून त्याच्या गैरसोयीची प्रभागरचना करण्याचा फंडा जुना आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यामध्ये अतिशय जाणकार मानले जातात. यंदा त्यांनी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच असा निर्धार केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना लक्ष करून प्रभाग रचनेबाबत आरोप सुरु केले आहेत. गमतीचा भाग म्हणजे सत्तेत भाजप(BJP) आहे. अशा स्थितीत विरोधात असलेल्या शिवसेना नेत्यांवरील हे आरोप चर्चेचा विषय ठरले आहेत.

मागील महिन्यात नाशिक महापालिका स्थायी समिती सभेत भाजप नगरसेवक व स्थायी समिती सदस्य मुकेश शहाणे यांनी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या घरात प्रभागरचना तयार करण्यात येत आल्याचा आरोप केला होता. त्या वेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर गुरुवारी नाशिक महापालिकेत या महिन्याची स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी त्या ठिकाणी काही समर्थकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी वादाचे स्वरूप प्राप्त होईल, अशी कुणकूण लागल्याने नाशिक पोलिसांनी स्थायी समिती सभागृहाबाहेर, तसेच सिडकोतील बडगुजर, शहाणे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवल्याचे चित्र नागरिकांना यानिमित्ताने बघायला मिळाले.

नाशिक महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण सध्या चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता नेते व कार्यकर्त्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. परंतु, अशा वेळी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, याकरिता नाशिक पोलिस सतर्क झाले आहे. त्यांनी खबरदारी म्हणून अशाप्रकारे पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे पाऊल उचलल्याचे दिसून आले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT