मलिकांजवळ तब्बल दोनशे किलो वजनाचे पुरावे ; भाजपचा बडा नेता रडारवर

मुंबै बँकेच्या तोंडावर आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या दरेकरांच्या अडचणीत भर पडणार आहे. या सगळ्या घोटाळात आतापर्यंत दोनशे किलो वजनाचे कागदपत्रेही जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 Praveen Darekar,Nawab Malik

Praveen Darekar,Nawab Malik

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि 'एनसीबी'चे अधिकारी समीर वानखेडेंनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या (Nawab Malik) रडावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आहेत. मुंबै बँकेच्या घोटाळ्याची नवी फाइल मलिकांच्या हाती लागली आहे. त्यावरचे तब्बल दोनशे किलो वजनाचे पुरावे घेऊन मलिक हे दरेकरांवर चाल करण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणात बरेच काळेबरे आहे; मात्र, 'वेट अॅण्ड वॉच' इतकेच सूचक विधान करीत मलिकांनी दरेकरांना इशाराच दिला आहे.

मुंबै बँकेतून ३७ कंपन्यांना कर्ज देताना घोटाळा झाल्याचेही मलिकांच्या निदर्शनास आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यात एका कंपनीच्या नावे ६५ कोटी रुपयांचे कर्ज देऊन त्यानंतर ही रक्कम रोखीत फिरविण्यात आल्याचेही माहिती गोळा केल्याचे मालिकांनीच सांगितले. या घोटाळांचे पुरावे देऊन चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबै बँकेच्या तोंडावर आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या दरेकरांच्या अडचणीत भर पडणार आहे. या सगळ्या घोटाळात आतापर्यंत दोनशे किलो वजनाचे कागदपत्रेही जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मालिकांच्या हातातील या दारुगोळ्याचा स्फोट होणार असल्याचे निश्चित आहे.

आधी आर्यन खान प्रकरणावरून वानखेडे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांवर आगपागड करीत चर्चेत आलेले मलिक रोजच माध्यमांच्या केंद्रस्थानी असतात. वानखेडे, फडणवीसांना नाकीनऊ आल्यानंतर भाजपने नेत्यांना मालिकांना 'टार्गेट' केले होते. त्यात मुंबै बँकेच्या प्रकरणात दरेकरांनी मालिकांविरोधात मानहानीची तक्रार दिली आहे. तेव्हापासून मुंबै बँकेच्या घोटाळ्यात लक्ष घातलेल्या मालिकांनी आता बँक आणि दरेकरांच्या व्यवहाराची 'कुंडली' गोळा करण्यास सुरवात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यापुढच्या मलिका आणि दरेकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा नवा प्रयोग पाहायला मिळणार आहे.

अन्य विषयांवर बोलताना मलिक म्हणाले, "कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचे उपाय करावे लागणार आहेत. त्यासाठी निर्णय घेण्यात येतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित घटकांशी चर्चा करून दिशा ठरविली जाईल " बुधवारी विधीमंडळात मजूर प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक बघायला मिळाली आहे.

<div class="paragraphs"><p> Praveen Darekar,Nawab Malik</p></div>
मोदींची नक्कल होताच फडणवीस 'तडफनीस' झाले ; रुपाली पाटलांचा टोला

मलिक म्हणाले, आपण इथे निवडून येत असताना शपथेवर माहिती देतो. मला सांगा दरेकरांनी जर 2016 साली शपथ पत्र सादर केले. त्यात 9 लाख 20 हजार इन्कम दाखवले. मात्र, यांच्याकडे 11 कोटी संपत्ती आहे. हे मजूर संस्थेकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर दरेकर म्हणाले की, आज राज्यात शेतकरी नाही तो शेतकरी झाला आहे. जो माथाडी नाही तो माथाडी झाला आहे. या विषयावर एक विशेष चर्चा घ्या. माझे त्याला पूर्ण समर्थन आहे. यावर मलिकांनी मला चर्चा घ्यायला काही हरकत नाही. मात्र, जे मजूर नाहीत ते कसे निवडणूक लढवत आहेत, असा हल्लाबोल केला व दरेकर खोटे बोलत असल्याचे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com