Devendra Fadnavis,Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : युद्धामुळे महाराष्ट्रातील नागरिक अकडले, मुख्यमंत्र्यांनी संकटमोचक महाजनांवर सोपवली मोठी जबाबदारी..

Israel Iran war, Devendra Fadnavis Assigns Key Responsibility to Girish Mahajan : अमेरिका, इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेलं युद्दाचा विमानसेवेवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील अनेकजण दुबईत अडकले आहेत.

Ganesh Sonawane

Maharashtra government : अमेरिका, इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेलं युद्द इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर अधिकच भडकलं आहे. या युद्धाची झळ आता जगभरातील इतर देशांना बसण्यास सुरूवात झाली आहे. युद्धजन्य स्थितीमुळे विमानसेवा ठप्प झाली असून महाराष्ट्रातील अनेक नागरिक दुबईत अडकून आहेत.

यातील काहीजण सुरक्षितरित्या भारतात मुंबई विमानतळावर परतले आहेत. मात्र अजूनही अनेकजण दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत. अशातच दुबई विमानतळाजवळ एअर स्ट्राईक झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे अकडून पडलेल्या नागरिकांचे नातवाईक काळजीत आहेत. अशातच अडकून पडलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सरसावलं आहे.

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकटमोचक म्हणून ओळख असलेले आपत्ती व व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. पुढील व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357 वर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे. स्वत:मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक्सपोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान , दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल झाले आहे. हे विशेष विमान आज पहाटे ३ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. मात्र अजून शेकडो भारतीय पर्यटक हे विदेशात अडकले आहेत. सर्वांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पूर्ण प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT