<div class="paragraphs"><p>IT Reids at Nashik &amp; Nandurbar</p></div>

IT Reids at Nashik & Nandurbar

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

अबब...त्या `गब्बर`ची संपत्ती मोजायला पाच दिवस लागले!

Sampat Devgire

नाशिक : प्रात्पीकर विभागाने (Income tax) गेल्या आठवड्यात नाशिक (Nashik)नंदुरबार (Nandurbar) शहरात विविध जमिनीची व्यावहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले. यामध्ये एखादा सिनेमा वाटावा असे घबाड हाती लागले. एव्हढी की त्याची मोजदाद तब्बल पाच दिवस सुरु होती. त्यामुळे हे छापे चर्चेचा विषय बनला आहे.

नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत त्यांना अनेक गंभीर माहिती मिळाली. त्याचे मुल्यांकण सुमारे २४० कोटी रुपये आहे. त्यात सहा कोटी रोख रक्कम आणि ५ कोटींचे दागिने यावेळी जप्त करण्यात आले. यावेळी एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी अशी माहिती व घडामोडी घडत होती. अगदी गब्बरसिंग चित्रपटात शोभावे असा प्रकार यावेळी घडले आहे. उत्तर महाराष्ट्रातातील हा एक मोठी छाननी ठरण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये ३२ ठिकाणी जमीन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार, कंत्राटादारांशी संबंधित बिल्डर्स यांच्या निवासस्थानावर हे छापे टाकण्यात आले होते. बुधवारी, २२ डिसेंबर रोजी पहाटे सुरू झालेली ही कारवाई सुमारे पाच दिवस चालली. या कारवाईत २४० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. एकाचवेळी नंदुबारसह इतर ठिकाणच्या बिल्डरची कार्यालये, घरे, भागीदारांचे निवासस्थान, नातेवाईक यांच्या घरी हे छापे टाकण्यात आले.

नाशिकमध्ये शहरातील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत आयकर विभागाने छापे टाकले. या कॉलनीतील व्यावसायिकांची घरे आणि त्यांच्या कार्यालयाची झडती यावेळी घेण्यात आली. यामध्ये विशेषतः देवळाली कॅम्प आणि भगूर येथील कार्यालयातही मोठी मालमतत्ता,खरेदी विक्री व्यावहाराचा तपशील, कागदपत्र सापडल्याचे कळते. या व्यावसायिकांच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली. शहराच्या अतिशय वर्दळीच्या व मध्यवस्तीत ही कारवाई झाली. मात्र त्याबाबत अतिशय गोपनियता पाळण्यात आली. त्यामुळे कोणालाही त्याचा थांगपत्ता लागाल नाही.

नंदुरबार व नाशिकला या मोठ्या कारवाईसाठी १७५ अधिकारी एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने निश्चित केलेल्या ठिकाणी पोहचले. त्यांच्या दिमतीला सुमारे वीस वाहनांचा ताफा होता. त्यांच्याकडे पोलिसांचे पथक देखील होते. यासाठी नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण येथील अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. आयकर विभागाला यावेळी पाच कोटींचे दागिने सापडले. त्यात अतिशय मौल्यवान हिरे, सोन्याची बिस्कीटे, मोत्याची दागिने अशी मोठी जडजवाहिरे सापडली. त्यात बेनामी संपत्ती आढळल्याचे कळते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT