Jalgaon BJP : गेल्या काही दिवसांपासून जळगाव मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महापालिकेचे काही माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी भाजपत जाण्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी भाजपने पूर्ण फिल्डिंग लावली असून 29 जुलै ला मुंबईत हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता भाजप सूत्रांनी वर्तवली आहे.
परंतु या पदाधिकाऱ्यांच्या भाजपमधील संभाव्य प्रवेशाला भाजपमधील स्थानिक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. भाजपमधील निष्ठावंत नाराज झाले असून त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे. निष्ठावंतांनी केवळ संतरंज्याच उचलायच्या का? अशा भावना खाजगीत ते व्यक्त करत आहेत.
गेल्यावेळी महापालिका निवडणुकीत भाजपने मोठे इनकमिंग करुन महापालिकेत बहुमत मिळवलं होतं. 75 जागांपैकी 57 जागांवर भाजपने विजय मिळवत पालिकेत सत्ता स्थापन केली होती. मात्र त्यानंतर शिवसेनेने 27 नगरसेवक फोडून भाजपची स्पष्ट बहुमताची सत्ता उलथवून लावली व आपला महापौर व उपमहापौर निवडून आणला.
ज्यांच्या नेतृत्वात हा प्रकार झाला, त्याच माजी नगरसेवकांसह उद्धव ठाकरे यांच्या गटातील माजी महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांना भाजप पक्षश्रेष्ठी पक्षात घेत आहे. मागचा अनुभव पाहाता त्यातून धडा घेण्याऐवजी ज्यांनी गद्दारी केली त्यांनाच रेड कार्पेट टाकलं जात आहे. त्यामुळे पक्षातील मुळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
मुदत संपली त्यावेळी महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. मात्र, आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नितीन बरडे , प्रशांत नाईक यांच्यासह अनेक जणांनी भाजपत जाण्याची तयारी केली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात पुढच्या पंधरा दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच लोकांनी भाजपच्या उमेदवारांविरोधात काम केलं होतं. पक्षाविरोधी काम केलेल्या याच पदाधिकाऱ्यांना पक्ष सन्मानाने प्रवेश देणार आहे. मग आम्हाला महापालिका निवडणुकीत उमेदवारी कशी काय मिळेल? असा प्रश्न भाजप निष्ठावंतांनी उपस्थित केला आहे. खासदार व आमदारांनी आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवाव्यात अशी अपेक्षा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.