Police at the spot after BJP leader and ex-corporator Prabhakar Chaudhary was attacked in Jalgaon. The political attack created shockwaves across the district. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon BJP Leader Attack : दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजनांनी कार्यालयाचं उद्धाटन केलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

Ex-Corporator Prabhakar Chaudhary : जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राण घातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाकर चौधरी असं हल्ला झालेल्या माजी नगरसेवकाचं नाव आहे.

Jagdish Patil

Jalgaon News, 27 Aug : जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राण घातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाकर चौधरी असं हल्ला झालेल्या माजी नगरसेवकाचं नाव आहे.

हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने चौधरी यांच्यावर वार केल्यामुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दोनच दिवसांपूर्वी प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं.

त्यानंतर लगेचच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटर जवळ हल्लेखोरांनी चौधरींवर धारदार कोयत्याने वार केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, या हल्ल्यात प्रभाकर चौधरींना गंभीर जखमा झाल्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला आहे.

त्यामुळे त्यांना उपचारासाठी धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र हा हल्ला नेमका कुणी का केला? याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT