Jalgaon Municiplr corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: जळगावचा महापौर कोण?बिनविरोध झालेल्या भाजपच्या या नगरसेविकेचे नाव जवळपास निश्चित, केवळ औपचारिकता बाकी!

Jalgaon BJP Mayor Election Minister Girish Mahajan gave an important response-भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार, नेत्यांनी दिले संकेत

Sampat Devgire

Jalgaon Mayor News: जळगाव महापौर पदासाठी भाजप सोमवारी उमेदवार निश्चित करण्याची शक्यता असते. महापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे पक्षाचा उमेदवार कोण? याविषयी जोरदार खलबते सुरू आहेत.

जळगाव महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. महापौर पदासाठी उज्वला बेंडाळे, दीपमाला काळे आणि संगीता पाटील या नगरसेविका इच्छुक आहेत. गेले दहा दिवस महापौर पदाचा निर्णय लटकल्याने इच्छुकांची कोंडी झाली आहे.

उद्यापासून महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या इच्छुकांना सूचना देण्यात येणार आहेत. संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राजू मामा भोळे यांनी पुढाकार घेतला.

जळगावचा महापौर कोण याचा निर्णय सर्वस्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अवलंबून आहे. सध्या तीन उमेदवार इच्छुक आहेत. त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र कोणताही निर्णय होऊ शकला नाही असे महाजन यांनी सांगितले.

मात्र भाजपच्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार उज्वला बेंडाळे आणि संगीता पाटील यांच्यातील तीव्र स्पर्धेमुळे भाजपने वेगळा निर्णय घेतला आहे. दीपमाला काळे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे कळते. तिच्या नावाची घोषणा येत्या दोन दिवसात होईल. त्यामुळे जळगावचा महापौर ही आता केवळ औपचारिकता राहिली आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपने शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी महायुती केली होती. महायुतीला ७५ पैकी ६९ जागा मिळाल्या. यामध्ये भाजपचे सर्व ४६ उमेदवार निवडून आले. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला २२ जागा मिळाल्या. त्यामुळे उपमहापौर पद शिवसेना शिंदे पक्षाला सोडण्यात येणार आहे.

महायुतीचे १२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यामध्ये भाजपच्या सहा नगरसेवकांचा समावेश आहे. भाग सात मधून दीपमाला काळे या बिनविरोध निवडून आले आहेत. उज्वला बेंडाळे या प्रभाग १२ मधून बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे या दोघींमध्ये स्पर्धा होती.

महापौर पद हे नागरिकांचा मागासवर्ग महिला गटासाठी राखीव आहे. त्यामुळे भाजपकडे अनुभवी नगरसेविका म्हणून मोजक्याच इच्छुक आहेत. महायुतीतील मोठा भाऊ म्हणून महापौर पद भाजपकडे राहणार आहे. त्या दृष्टीने सध्या दीपमाला काळे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या उमेदवारीची आणि पर्यायाने महापौर म्हणून नाव जाहीर होण्याची औपचारिकता शिल्लक आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT