Mahayuti internal conflict : महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी याला तोंड फोडले आहे. जळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यशाळेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोरदार 'लक्ष्य' केले.
'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे बरे झाले. मागील अडीच वर्षांचा काळ भाजपसाठी खूप वाईट होता', अशी भावना मंत्री महाजन यांनी बोलावून दाखवली. यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याची महायुती (Mahayuti) सरकारकडून जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रत्येक नियोजनावर लक्ष ठेवून आहे. यासाठी नियोजनाच्या प्रत्येक आयोजित बैठकीला मंत्री गिरीश महाजन आवर्जून हजर राहतात. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर मंत्री महाजन यांच्यावर कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी आहे.
नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रिपदाचा वाद जरी असला, तरी महाजन स्वतःला 'कुंभमेळा मंत्री' म्हणून घेतात. यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. भाजपला महायुतीत शिवसेनेशी संघर्ष करावा लागला आहे, असेच काहीसे चित्र दिसते आहे. यातून मंत्री महाजन यांनी वरील विधान करत भाजपला आता एकनाथ शिंदेंची देखील शिवसेना नको आहे, असाच अप्रत्यक्षपणे सूचक संकेत दिल्याची चर्चा आहे.
मंत्री महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आपले कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा नामोल्लेख टाळून लक्ष्य केले. मंत्री महाजनांनी एकाच वेळी मन की बात बोलून टाकल्यानं भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला 'एकला चलो रे'ची भूमिका असेल, असेच दिसते आहे.
मंत्री महाजन म्हणाले, "कोणी काहीही बोलत असेल, तर त्याकडे लक्ष देऊ नका. बडबड करणाऱ्यांची अवस्था काय आहे, हे जनतेला माहीत आहे. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून ते वेगवेगळी विधानं करतात. चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात". आपल्याविषयी बोलूनच त्यांना प्रसिद्धी मिळते. आपण मात्र आपल्या भूमिकेवर, मार्गावर ठाम राहायचे, असा सल्ला देखील मंत्री महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.