Lalit Kolhe News: जळगाव कॉल सेंटर फसवणुकीची पाळीमुळे खोलवर रुजली आहेत. त्यात राजकीय नेत्यांचा थेट सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाला मोठा धक्का बसला.
जळगावचे माजी महापौर आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते ललित कोल्हे यांना पोलिसांनी मोठा झटका दिला आहे. जळगाव शहरातील सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी जळगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. एल. के. फार्म हाऊस वर या संदर्भात कॉल सेंटर उघडण्यात आले होते. सायबर फसवणुकीचा प्रकार सुरू होता. त्यातून अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.
यासंदर्भात पोलिसांनी सय्यद निसार अहमद सय्यद ओशिवरा (मुंबई) आणि अकबर खान रौनक अली खान (मालाड पूर्व मुंबई) यांना अटक केली आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार सुरू होते. त्याचे मास्टर माईंड म्हणून या दोघांना अटक करण्यात आली.
संबंधितांना अटक केल्यावर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. हा फसवणुकीचा प्रकार सुरू होण्यापूर्वी पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका झाल्या. बैठकांमध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांचा सहभाग होता.
संबंधित आरोपींची पोलिसांनी विविध प्रकारे चौकशी केली. यामध्ये देशात तसेच परदेशातही फसवणूक करून पैसे लाटण्याचे त्यांचे मनसुबे होते. या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्याशी आपला "पुराना याराना" आहे, असे सूचक विधान त्यांनी केले.
सध्या माझे महापौर कोल्हे हे नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये आहेत. त्यांनी प्रयत्न करूनही त्यांच्या जामीनाला पोलिसांनी विरोध केला. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कॉल सेंटर ज्या जागेत सुरू होते. ती जागा श्री कोल्हे यांच्या मालिकेची असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.