Ajit Pawar & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Bank News; बँकेचा अध्यक्ष खडसे ठरवणार की अजित पवार?

जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

Sampat Devgire

जळगाव : (Jalgaon) जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. रिक्त अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे (NCP) ॲड. रवींद्र पाटील, संजय पवार, प्रदीप देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. याबाबतचा अंतीम निर्णय पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) घेणार की राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) घेणार आहेत. त्यामुळे श्री. पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. (Ajit Pawar will decide Chairmen candidate of District Bank)

अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या कारकिर्दीलाएक वर्ष पुर्ण झाले. ठरल्याप्रमाणे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाला होता. सोमवारी त्यांनी राजीनामा दिला नाही. राजीनाम्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानुसार ते आज (ता. ७) राजीनामा देणार आहेत.

जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत आपली कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. मंगळवारी (ता. ७) आपण पदाचा राजीनामा देणार आहोत, अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली. त्यामुळे पुढील अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण याबाबत उत्सुकता लागली आहे. त्यासाठी लॉबींग सुरु झाले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या राजकीय डावपेचांमुळे शेवटच्या क्षणी उमेदवार ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.

नवीन अध्यक्ष नियुक्तीबाबत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हा निर्णय जाहीर केला होता.

याबाबत त्यांनी सांगितले होते, की जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे बहुमत झाले होते. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद एक-एक वर्षे नियुक्त करण्याचे ठरले होते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संचालक म्हणून आम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. उपाध्यक्षपद शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय ते घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT