Aditya Thackrey News; मैदानात या, मी ठाण्यातूनही लढायला तयार!

हिंमत असेल तर गद्दारी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी
Aditya Thackrey
Aditya ThackreySarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महाराष्ट्र (Maharashtra) गद्दारी सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान आहे, आपण दोघे राजीनामा देऊ. तुम्ही वरळीत (Mumbai) जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात (Thane) येऊन लढतो, असे खुले आव्हान देत आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात रणशिंग फुंकले. (Shivsena Leadre Aditya Thackrey clarion Eknath Shinde for Resignation)

Aditya Thackrey
Kasba By-Election : टिळक कुंटुंबाला डावललं, मतदार म्हणतात भाजपला दाखवून देवू...

श्री. ठाकरे यांची आज नाशिक रोडला जाहीर सभा झाली, त्या वेळी ते बोलत होते. आमदार अंबादास दानवे, उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, शुभांगी पाटील, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप, विलास शिंदे, माजी नगरसेवक अस्लम मणियार, सुधाकर फोकने, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

Aditya Thackrey
High Court : मॉक ड्रिलमध्ये मुस्लिम दहशतवादी दाखवू नये, गृह मंत्रालय, पोलिस महासंचालकांना नोटीस

श्री. आदित्य म्हणाले, सभेला महिला आणि तरुणांची संख्या लक्षणीय आहे. सभेला काही बोलावे असं उरलेच नाही. हा जनतेचा प्रचंड उत्साह म्हणजे सत्ताधाऱ्यांविरोधातील अंगार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी जे केले ते महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडलेले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेत निष्ठेला महत्त्व आहे. गद्दारीला नाही. त्याचे परिणाम शिंदे व त्यांचे बंडखोर रोज अनुभवत आहेत. त्यामुळे ते धास्तावले आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘गद्दारी राज्यात कुणालाच पटलेली नाही, असे ठणकावून सांगत ४० गद्दार आधी गुजरात, नंतर गुवाहाटी, तेथून गोव्याला गेले, नंतर इकडे आले. त्यांनी खोक्याला हात लावला नाही, असे म्हणता येईल का? ते डरपोक आहेत. लोक त्यांना मतदारसंघात फिरू देऊ शकत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे आज निवडणुका घ्या, घटनाबाह्य मुख्यमंत्री हे आव्हान स्वीकारतील का, अशी टीका ठाकरे यांनी केली.

राज्याचे उद्योग घालवले

मुख्यमंत्री २८ तास दाओसला गेले, त्यासाठी सुमारे ४० कोटी खर्च केले. राज्यातील पाच उद्योग गुजरातला घालवले. राज्यात मुंबई, नाशिकसह सगळीकडे प्रशासक आणि ठेकेदारांचे राज्य सुरू आहे. मुंबई सोडून राज्यातील महापालिका तोट्यात आहेत, नागरिकांच्या कराच्या पैशांची उधळपट्टी रोखण्याची गरज आहे. नाशिकपेक्षा मुंबईची वाहतूकव्यवस्था स्वस्त आहे. राज्यात हिंदुत्वाचे नव्हे गद्दारांचे सरकार आहे. यांच्यात निवडणुका घेण्याची धमक नाही. मात्र मी यांच्याविरोधात लढणार आहे. आपण माझ्यासोबत लढायला तयार आहात ना, अशी भावनिक साद आदित्य ठाकरे यांनी घातली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com