Sumit Patil's Nomination Rejected in Jalgaon DCC Bank Election  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon DCC Bank Election : अदृश्य शक्तीची जादूही ठरली फेल, शिवसेना आमदार किशोर पाटलांनी करुन दाखवलं, मुलाची बिनविरोध निवड

Sumit Patil Elected Unopposed JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांनी मुलगा सुमित पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने सुमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

Ganesh Sonawane

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजप उमेदवार सतीश शिंदे यांनी माघार घेतल्याने सुमित पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या जागेवरुन भाजप व शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरु होती. मात्र अखेरीस आमदार किशोर पाटील यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करत भाजपला शस्र टाकण्यास भाग पाडलं.

आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील पाचोरा विकास सोसायटी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सुमित पाटील हे पहिल्यांदाच जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक लढत असून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सुरुवातीला भाजपचे सतीश शिंदे यांनी अर्जावर आक्षेप घेतल्याने सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाला होता, त्यावर राजकीय दबावामुळे अर्ज बाद झाल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप करत त्यांनी अर्ज बाद झाल्यानंतर संताप व्यक्त केला होता. या जागेवरुन महायुतीत वादाची ठिणगी पडली होती. आमदार किशोर पाटील यांनी मुलासाठी आक्रमक भूमिका घेतली.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केल्यानंतर सुमित पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधकाकडे धाव घेतली होती. सुमित पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील केल्यावर त्यावर सुनावणी झाली. सुनावणीत पाटील यांचा अर्ज पुन्हा वैध ठरल्याने त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. हा भाजपसाठी मोठा धक्का होता, त्यामुळे पाटील यांनी अदृश्य शक्तीवर मात केल्याचं बोललं गेलं.

दरम्यान महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाची चर्चा सुरु होती. महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरलं होतं. मात्र, काही जागांवर तिढा कायम होता. त्यातच एक जागा पाचोऱ्याची होती. पाचोरा येथील जागेवर भाजप देखील आग्रही होतं. मात्र, आमदार किशोर पाटील यांनी या जागेवर ठाम दावा सांगितला होता. मात्र, उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने आमदार पाटलांचे चिरंजीव सुमित पाटील बिनविरोध निवडले गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT