Jalgaon DCC Bank Election : 'भाऊ फक्त तुमच्यासाठी' म्हणत भाजप कार्यकर्त्याची माघार, गिरीश महाजनांनी उधळला बिनविरोध'चा गुलाल

Girish Mahajan unopposed election in Jalgaon DCC Bank : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतीस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी बिनविरोध निवड झाली आहे.
JDCC Bank Election 2026 BJP strategy
JDCC Bank Election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Girish Mahajan unopposed election in Jalgaon DCC Bank : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या दिवशी मोठी घडामोड घडली. प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने, जामनेर मतदारसंघातून जिल्हा बॅंकेच्या आखाड्यात उतरलेल्या मंत्री गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. मंत्री गिरीश महाजन बिनविरोध विजयी झाले आहेत.

मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजप कार्यकर्ते तुकाराम निकम यांनी माघार घेतल्याने मंत्री महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्यासह रघुनाथ पाटील आणि तुकाराम विठोबा निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रघुनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला होता. या निर्णयाविरोधात पाटील यांनी नाशिक येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हरकत दाखल केली होती. मात्र, नाशिक सहाय्यक निबंधकांनी रघुनाथ पाटील यांची हरकत फेटाळली. त्यामुळे निवडणूक रिंगणात गिरीश महाजन आणि तुकाराम निकम हे दोन उमेदवार उरले होते.

आज मंगळवार (दि.१७) उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी तुकाराम विठोबा निकम यांनी आपला अर्ज मागे घेत गिरीश महाजन यांना पाठिंबा जाहीर केला. मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो आणि भाऊ फक्त तुमच्यासाठी, असा फलक घेऊन तुकाराम निकम यांनी माघार घेतली.

JDCC Bank Election 2026 BJP strategy
Jalgaon DCC Bank Election : सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांना फोन, जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार?

त्यामुळे आता जामनेर विकास सोसायटी मतदारसंघात गिरीश महाजन यांच्याविरोधात अन्य कोणीही उमेदवार शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे.

JDCC Bank Election 2026 BJP strategy
Jalgaon ACB Trap : वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी 40 हजारांच्या लाचेची मागणी; महावितरणचे तीन अधिकारी ACB च्या जाळ्यात!

मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वीच जामनेर तालुक्यातून बिनविरोध निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला होता. जामनेर तालुक्यातील विकास संस्थांच्या एकूण ९४ मतांपैकी ८५ मते आमचीच म्हणजे भाजपची असल्याचा दावा त्यांनी केला होता. निवडणूक झाली असती तरी आपणच निवडून आलो असतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान विरोधातील एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने व एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने मंत्री गिरीश महाजनांची जिल्हा बॅंकेच्या आखाड्यात दमदार एण्ट्री झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.