Jalgaon Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Police : नुकतच अधिवेशनात प्रकरण गाजलं, अन् आता पोलिसांच्या हाती लागलं 60 कोटींचं घबाड

Jalgaon drug seizure : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. अशातच चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी ड्रग्सप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon News : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. जळगाव जिल्ह्यात अनेकदा ड्रग्सची सर्रास तस्करी व विक्री होत असताना पोलिसांकडून कारवाया झाल्या आहेत. परंतु तरीही तस्करी थांबलेली दिसत नाही. अशातच गुरुवारी (24 जुलै) मध्यरात्री चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी ड्रग्सप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे फाटा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास महामार्ग पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान येणाऱ्या कारला थांबवत 39 किलो ड्रग्स पकडलं आहे. जवळपास 50 ते 60 कोटी किमतीचे हे ड्रग्स आहे. या कारवाईत पोलिसांनी अँफेटामाईन हा अत्यंत घातक आणि प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केला. यानंतर आता मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

रात्रीच्या वेळी ही कार दिल्लीहून छत्रपती संभाजीनगर मार्गे कर्नाटकातील बंगळुरूकडे नेत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महामार्ग पोलीस चौकीजवळ ही गाडी महामार्ग पोलिसांनी थांबविली. यानंतर तपासणी केली असता गाडीच्या विविध भागांमध्ये हे ड्रग्ज लपवलेलं होतं. याप्रकणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन वाहन जप्त करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपीविरुद्ध याआधी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल होता. तो नुकताच तुरुंगातून सुटला आहे. अब्दुल असीम सय्यद (वय. 48, रा दिल्ली) असे त्याचे नाव आहे.

राज्य आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. यामध्ये केवळ आंतरराज्य रॅकेट नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज नेटवर्क कार्यरत असल्याची भीती व्यक्त होत आहे. अँफेटामाईन हा पदार्थ प्रामुख्याने विदेशातून तस्करी करून भारतात आणला जातो आणि देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करण्यासाठी वापरला जातो, अशी माहिती उघड झाली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याप्रकरणी युद्ध पातळीवर तपास सुरु केला आहे.

दरम्यान चाळीसगाव तालुक्याचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या संदर्भात माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राला भेट दिली. संपूर्ण कारवाईची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना या प्रकरणाची माहिती दिली गेली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT