Eknath Shinde, Girish Mahajan, Mangesh Chavan 
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics : जळगावात भाजपला नडणाऱ्या आमदाराला एकनाथ शिंदेंकडून बूस्ट, सोपवली मोठी जबाबदारी

Eknath Shinde’s Strategic Support to MLA Kishor Patil : भाजप नेते कधी पलटी खातील त्याचा भरोसा नाही असं म्हणत किशोर पाटलांनी आपल्या मतदारसंघात शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली.

Ganesh Sonawane

Jalgaon politics : जळगाव जिल्ह्यात शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजप नेत्यांना शिंगावर घेतलं आहे. आपल्या पाचोरा-भडगाव मतदारसंघात सर्वात आधी त्यांनी स्वबळावर निवडणुक लढवण्याची घोषणा करत मित्र पक्ष असलेल्या भाजपलाच आव्हान दिलं आहे.

त्यामुळे जळगाव जिल्ह्यात किशोर पाटील यांच्याविरोधात स्थानिक सगळे भाजप नेते एकत्र आल्याचे चित्र आहे. मात्र किशोर पाटील यांनी त्यांना न जुमानता स्वबळावर निवडणुकीची घोषणा करत नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. एकीकडे युतीसंदर्भात खलबते सुरु असताना किशोर पाटलांनी स्वबळाची घोषणा करत तिकडे पत्नीच्या प्रचाराचा नारळही फोडला.

जळगाव जिल्ह्यात भाजपची ताकद चांगली असल्याने भाजपने बऱ्याच ठिकाणी नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये मित्र पक्षांना फारसे महत्व न दिल्याचे दिसते. भाजपने केवळ काही मोजक्या ठिकाणीच युती केली असून त्यातही राजकीय स्वार्थ साधण्याचा आरोप होतो आहे. अशातच भाजप नेत्यांना थेट नडणारे व सर्वात आधी स्वबळाचा नारा देणारे किशोर पाटील यांना शिवसेनेने अर्थात एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनीही किशोर पाटील यांच्या भूमिकेवर टीका केली होती. आता त्यांनाच शह देण्यासाठी शिवसेना शिंदे गटानेही आमदार किशोर पाटील यांना मोठी जबाबदारी आता सोपवली आहे. शिंदे गटाने नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांसाठी जिल्हानिहाय निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली असून आमदार पाटील यांच्याकडे पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर नगर परिषदांसह शेंदुर्णी नगर पंचायतीची सूत्र दिली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव, भुसावळ, धरणगाव , नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुक प्रभारी पदी गुलाबराव पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर चोपडा, फैजपूर, यावल,एरंडोल, पारोळा नगरपरिषदेसाठी आमदार चंद्रकांत सोनवणे, एरंडोल व पारोळा साठी आमदार अमोल पाटील, रावेर, सावदा नगरपरिषद व मुक्ताईनगर पंचायतीसाठी आमदार चंद्रकांत पाटील व अमळनेर नगरपरिषदेसाठी आमदार शिरीष चौधरी यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT