Eknath Khadse Girish Mahajan  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan On Eknath Khadse : 'खडसेंचा 'दिवा' विझला, ग्रामपंचायत पण गेली...', गिरीश महाजनांनी ठेवलं वर्मावर बोट

Eknath Khadse News : एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाने जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. जळगाव जिल्ह्यात खडसे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष सोबत असलेल्या खडसे यांना पुन्हा पक्षात घेण्यात दिल्लीतून सुत्र हलली

Roshan More

Jalgaon Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय वैर आहे. महाजन यांच्यावर एकही टीका करण्याची संधी खडसे यांनी सोडली नाही. तर, महाजन देखील खडसेंनी डिवचण्यात मागे नाहीत. मात्र, 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षात असलेले एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही भाजपात (BJP) जाणार आहेत. एकनाथ खडसे यांनीच तशी घोषणा केली आहे. पण खडसे पुन्हा भाजप येणार असल्याचे माहिती असूनही गिरीश महाजन यांनी खडसेंवर खोचक टीका केली आहे.

'दूध संघ गेला . ग्रामपंचायत पण नाही. बँक नाही. आमदारकीमध्ये मुलगी पडली. त्यांचा दिवा विझला आहे. एकनाथ खडसे याचं आता काय राहीलं आहे.' असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राजकीय ताकदीवरच संशय घेतला आहे. शिवाय एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशा विषयी बोलताना नाथाभाऊचा पक्षप्रवेश कधी होईल माहित नाही, असे म्हणत खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला महत्त्व दिले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाने जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. जळगाव जिल्ह्यात खडसे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष सोबत असलेल्या खडसे यांना पुन्हा पक्षात घेण्यात दिल्लीतून सुत्र हलली असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील नेत्यांचा यात सहभाग नव्हता असे देखील बोलले जात आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका

एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये खुप त्रास झाला. म्हणूनच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका करत संजय राऊत यांची बाग देणाऱ्या कोंबड्यासोबत तुलना केली. दररोज सकाळी राऊत यांच्यासारखा मी बाग देत नाही, असे महाजन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT