Gulabrao Deokar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Deokar : जे नको व्हायला तेच झालं, अजित पवारांच्या पक्षात येताच गुलाबरावांच्या मागे लागलं चौकशीचं ग्रहण

Gulabrao Deokar joins Ajit Pawar’s NCP; inquiry begins in district bank loan case : अजित पवार गटात प्रवेश करुन दोन दिवसही उलटत नाही तोच देवकर यांच्या मागे चौकशीचं ग्रहण लागलं आहे. देवकरांच्या 10 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी चौकशी सुरु झाली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकताच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असल्याने देवकरांच्या अडचणी कमी होणं अपेक्षित होतं. मात्र याउलट त्या आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

३ मे रोजी मुंबई येथे जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक माजी नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. अजित पवार गटात प्रवेश करुन तीन दिवसही उलटत नाही तोच देवकर यांच्या मागे चौकशीचं ग्रहण लागलं आहे. देवकरांच्या 10 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी चौकशी सुरु झाली आहे.

काल धुळ्याचे उपजिल्हा निबंधक राजेंद्र वीरकर यांच्या नेतृत्वात असलेले चौकशी पथक जिल्हा बॅंकेत दाखल झालं होतं. श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या वतीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेण्यात आलेल्या तब्बल १० कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ही चौकशी आहे. संस्थेने घेतलेल्या कर्ज प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गुलाबराव देवकर हे या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. देवकर यांनी हे कर्ज विधानसभा निवडणुकीच्या काळात बेकायदेशीरपणे घेतले असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे मंत्री व देवकर यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गुलाबराव पाटील यांनी केला होता. देवकर यांनी अनेक आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार केले आहेत. त्यावर पांघरुण घालण्यासाठी देवकर अजित पवार गटात आल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ही चौकशी सुरु झाली आहे.

देवकर यांना पक्षात घेतल्याने गुलाबराव पाटील अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी अजित पवार यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकदा चर्चा करायला हवी होती. त्यांना या निर्णयाचा पश्चाताप होईल असं म्हटलं आहे. माणसं तपासून पक्षात घेत असल्याचं अजित पवार सांगतात मात्र देवकरांसारखी चांगली माणसं त्यांनी तपासून घेतली असा खोचक टोलाही गुलाबरावांनी अजित पवारांना लावला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील महायुतीमधील धुसफूस यामुळे वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT