Jalgaon municipal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News : ..तर जळगाव महापालिका आयुक्तांची रवानगी थेट जेलमध्ये, 10 मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Jalgaon HUDCO land case : जळगाव महापालिका प्रशासनाला हलगर्जीपणा नडला असून महापालिका आयुक्तांची रवानगी थेट दिवाणी कारागृहात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : शहरातील शिवाजीनगर भागातील हुडको घरकुल योजनेसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणी सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांनी महापालिका आयुक्तांना थेट कारणे दाखवा नोटीस बजावली असून, १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेने १९९९ मध्ये श्रीराम गोपालदास खटोड यांच्या मालकीची दोन एकर जमीन घरकुल योजनेसाठी संपादित केली होती. मात्र, मोबदला देण्याच्या प्रक्रियेत प्रशासनाकडून सातत्याने टाळाटाळ झाली. यानंतर २००१ मध्ये न्यायालयाने ५० टक्के रक्कम अदा करण्याचे आदेश दिले, तरीही ते पूर्ण झाले नाहीत. अखेर २००८ मध्ये दावा दाखल झाला. अवमान याचिकेनंतर महापालिकेकडून काही रक्कम जमा करण्यात आली. महानगरपालिका प्रशासनावर न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले असून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महानगरपालिकेने या प्रकरणाला नंतर खंडपीठात आव्हान दिले होते. त्या प्रकरणी मिळालेली स्थगिती ही १८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात आली. स्थगिती संपल्यानंतरही मोबदला न दिल्याने खटोड यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून हुकूमनाम्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तसेच आयुक्तांना अटक करून कारागृहात ठेवण्याची मागणी केली.

या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने २३ फेब्रुवारी रोजी आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आपल्याला दिवाणी कारागृहात का पाठवू नये? या थेट प्रश्न न्यायालयाने उपस्थितीत केला आहे. दरम्यान आयुक्तांनी आदेशाची अंमलबजावणी का केली नाही, याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना दिवाणी कारागृहात पाठविण्याची कारवाई केली जाऊ शकते.

खटोड यांचे वाढीव मोबदला, व्याज व भाडे, असे एकूण ४५ कोटी रुपये घेणे आहेत. या प्रकरणामुळे महापालिकेवर मोठा आर्थिक ताण पडण्याची शक्यता आहे. सुमारे ४५ कोटी रुपयांची रक्कम एक रकमी अदा करावी लागल्यास त्याचा शहरातील विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान १० मार्च रोजी याप्रकरणावर होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT