Malegaon Fake Currency : मालेगाव पुन्हा चर्चेत! टीपू सुलतान फोटो-नमाज वादानंतर आता बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड

Malegaon fake currency case : मालेगावमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा चलणात आणणाऱ्या टोळीचा मालेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. संभाजीनगर येथून मुख्य सूत्रधाराला मालेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Malegaon Fake Currency
Malegaon Fake CurrencySarkarnama
Published on
Updated on

Malegaon : गेल्या काही दिवसांपासून मालेगाव विविध कारणांनी राज्याच्या केंद्रस्थानी आहे. मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने झालेला वाद असो किंवा त्यानंतर महापालिकेच्या कार्यालयात लोकसंघर्ष समितीच्या कार्यकत्यांनी केलेलं नमाज पठण यामुळे मालेगाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. आता मालेगावात बनावट नोटा प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात आली आहे.

मालेगाव येथील HDFC बँकेत महिंद्रा ॲन्ड महिंद्रा फायनान्स कंपनीच्या एजंटने ५० हजार ५०० रुपयाच्या बनावट नोटा भरण्याचा धक्कादायक प्रकार २३ जानेवारीला उघडकीस आला होता. या संदर्भात बॅंकेचे अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लावला असून छत्रपती संभाजीनगर येथील ‘मास्टरमाइंड’ला पाच जणांसह अटक केल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक तेगबिरसिंह संधू यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

२३ जानेवारी २०२६ रोजी येथील एचडीएफसी बँकेत ५०० रुपयाच्या बनावट शंभर नोटा असे एकूण ५० हजार रुपये भरल्याचा प्रकार घडला होता. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीचा कलेक्शन एजंट गणेश खरे हा मालेगावच्या सटाणा नाका परिसरातील एचडीएफसी बँकेत भरणा करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने बँकेत ८९ हजारांचा भरणा केला. तेव्हा बँकेचे असिस्टंट मॅनेजर मोहन मुसळे यांना भरणा केलेल्या एकूण रकमेपैकी ५०० रुपयांच्या १०० नोटा म्हणजे एकूण ५० हजार रुपये बनावट असल्याचा संशय आला. या प्रकरणी मुसळे यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला.

Malegaon Fake Currency
Malegaon News : महापालिकेत नमाज पठण करणं भोवलं, सात जणांवर पोलिसांची मोठी कारवाई..मालेगावात खळबळ

पोलिसांनी एजंट गणेश खरे याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, सदरील रक्कम जातेगाव येथील अजय राठोड याने ट्रॅक्टरच्या हप्त्या पोटी हे पैसे दिले होते. छावणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी अजयला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने सदर बनावट नोटा करण राठोड याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी करणला ताब्यात घेवून तपास सुरु केला. यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बन्सीलाल यादव याला ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सदर नोटा कन्नड येथील रेहान खान व समीर शेख यांच्याकडून घेतल्याचे समजले. पोलिसांनी खोलवर जावून तपास केला. संभाजीनगर येथील गोल्डन कुरेशी याला अजिंक्य जाधव व शुभम थोरात याने बनावट नोटा दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांची कसून चौकशी करत मुख्य सुत्रधार संतोष उत्तमराव केळसकर याच्या छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Malegaon Fake Currency
CEO Omkar Pawar : IAS ओमकार पवार झाले वऱ्हाडी... दोन एकट्या जीवांसाठी अख्खं गाव एकत्र आलं अन् संपन्न झाला एक अनोखा विवाह

रॅकेटचा मुख्य सूत्रधार संभाजीनगर येथील संतोष केळसकर हा असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून ५०० रुपये किंमतीच्या २०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच संतोषच्या विनायक ग्राफीक्स दुकानातून बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, संगणक, प्रिंटर, ८५, जीएसएम पेपर, स्क्रीन प्रिंट, पेन ड्राईव्ह, मोबाईल, प्रिंट इंक, स्केल, कटर असा १ लाख ३६ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात पोलिसांनी पाचशे रुपये किंमतीच्या ३८५ बनावट नोटा जप्त केल्याचे सांगितले. मालेगावातील हा बनावट नोटांचा तिसरा प्रकार उघडकीस आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com