Jalgaon Panchayat Samiti Bribery Case News : ग्राम पंचायत अंतर्गत केलेल्या कामाच्या बिलाचे देयकाची रक्कम मंजूर करून दिली. त्या मोबदला म्हणून तीन टक्के प्रमाणे २५ हजार रुपयांची लाच घेताना जळगाव जामोद पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी तथा विद्यमान विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे यांना अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता.१५) दुपारी १२ वाजता त्यांच्याच कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदार बांधकाम कंत्राटदार असून त्यांनी आसलगाव ग्राम पंचायत अंतर्गत सन २०२५-२०२६ या कालावधीत २ नाली बांधकाम व १ पेव्हर ब्लॉक रस्ता तयार केला होता. या तिन्ही कामांच्या बिलाचे देयकाची रक्कम मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी संदीप उत्तमराव मोरे यांनी बिलाच्या रकमेच्या तीन टक्के प्रमाणे २५ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली होती.
यासंदर्भात तक्रारदाराने ३ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे तक्रार नोंदविली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१५) पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता संदिप मोरे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष संदिप मोरे यांनी लाचेची रक्कम २५ हजार रुपये त्यांचे खाजगी वाहनामध्ये ठेवण्यास सांगून स्वतः लाच स्विकारली. यावेळी एलसीबी पथकाने तात्काळ मोरे यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कार्यवाही अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक अमरावती सचिन्द्र शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडली.
मोरे कोट्यवधींचा धनी
संदीपकुमार मोरे हे जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये कित्येक वर्षापासून कार्यरत असून बराच काळ त्यांचेकडे गटविकास अधिकारी पदाचा पदभार होता. या काळात त्यांनी कोट्यावधी रुपयांची माया जमविल्याची चर्चा आज पंचायत समिती परिसरात सुरू होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.