MLA bribery case : राजकारणात खळबळ : आमदार फोडण्यासाठी 35 कोटींची ऑफर; थेट माजी मंत्र्यांचा हात, तिघांना अटक करताच मोठं 'ऑपरेशन' उघड

Tamil Nadu politics, TVK MLA bribery case, Vijay government crisis : इलाईराजा यांच्या तक्रानुसार, संबंधित व्यक्तीने त्यांना अध्यक्षांविरोधात प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याची विनंती केली होती.
TVK MLA bribery case
TVK MLA bribery caseSarkarnama
Published on
Updated on

MLA controversy news : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. तमिळनाडूतील नवनियुक्त सरकार अस्थिर करण्यासाठी घोडेबाजाराचे षडयंत्र रचण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमदाराला तब्बल ३५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम या पक्षाचे आमदार एन. इलाईराजा यांनी तामिळनाडू पोलिसांत याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधातील ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी आपल्याला ३५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा इलाईराजा यांनी तक्रारीत केला होता.

या षडयंत्रामागे डीएमके सरकारमधील माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी आणि त्यांचे बंधू व्ही अशोक कुमार यांचेही नाव तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हे षडयंत्र रचल्याचा आरोप होत आहे. इलाईराजा यांनी २९ जून रोजी ग्रेटर चेन्नई पोलिसांत याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार एका व्यक्तीने इंडियन पोलिटिकल डेमोक्रेटिक स्ट्रॅटेजी ही संस्था चालवत असल्याचे सांगितले होते. तसेच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांमार्फत आपण संपर्क करत असल्याचा दावा त्याने केला होता.

TVK MLA bribery case
Cabinet expansion news : मोठी बातमी : मंत्रिमंडळ विस्ताराआधी उपपंतप्रधान पदाची चर्चा, NDA तील मित्रपक्षासह विरोधी पक्षाचेही एका नावावर एकमत

इलाईराजा यांच्या तक्रानुसार, संबंधित व्यक्तीने त्यांना अध्यक्षांविरोधात प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याची विनंती केली होती. त्यासाठी ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली. पण हे करण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकाविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर काही तासांत तिघांना अटक करण्यात आली आहे.

TVK MLA bribery case
Shiv Sena News : विधानपरिषदेतील आणखी एक आमदार फुटणार? ठाकरेंकडे उरलेत 'बेस्ट फाईव्ह'; पक्षांतर बंदी कायद्यातून कोण वाचणार?

तीन आरोपींपैकी एका आरोपीला डीएमकेचे आमदार व्ही. सेन्थिल बालाजी आणि त्यांचे बंधू भेटल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी सखोल तपास केला जात असून षडयंत्रामध्ये कोण-कोण सहभागी होते, याचा शोध घेतला जात आहे. पुढील सहा महिन्यांत सरकार कोसळणार असल्याचा दावा डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी सरकार स्थापनेवेळीच केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com